संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे मुलाखतींचे आयोजन तरुणांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे मुलाखतींचे आयोजन तरुणांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि ४ जुन २०२६–कोपरगाव तालुक्यातील युवक-युवतींसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून तरुणांना नामांकित मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
जाहिरात
यात पुणे येथील अॅप्टिव्ह कॉम्पोनंट्स इंडिया प्रा. लि. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील गरवारे हायटेक फिल्म्स लि. या कंपन्यांचा सहभाग असणार आहे.एसएससी, एचएससी आयटीआय,मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, डिप्लोमा ई अँड टीसी, पदवीधर,तसेच एम.एस्सी. केमिस्ट्री, बी.टेक आणि बीई (मेकॅनिकल) शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
जाहिरात
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.उमेदवारांनी मुलाखतीसाठी अपडेटेड सीव्ही, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे व पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच पोस्टरवरील क्यूआर कोड स्कॅन करून फॉर्म भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जाहिरात
या मुलाखती शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. (नवीन बिल्डिंग सभागृह),सहजानंदनगर, कोपरगाव येथे होणार आहे.अधिक माहितीसाठी ८३२९२१४७१९ / ८१८१९०९०९० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.