लाडकी बहीण योजनेचा सर्व भगिनींनी लाभ घ्यावा – मा.आ.स्नेहलताताई कोल्हे
“हक्काची बहीण आमच्या हक्कांसाठी” महिलांची सौ कोल्हे यांच्या बद्दल प्रतिक्रिया
कोपरगाव विजय कापसे दि ९ जुलै २०२४– महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ कोपरगाव मतदार संघातील सर्व महिला भगिनींनी घ्यावा. मा.आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्यावतीने कोपरगांव शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक भगिनीची या योजनेसाठी नोंदणी करुन घेतली जात आहे. हक्काची बहीण हक्कासाठी या भुमीकेतुन कायमस्वरुपी महिला सबलीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या स्नेहलताताई कोल्हे यांनी सर्वच लाभार्थी महिला भगिनींनी नोंदणी करुन घ्यावी यासाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करावा अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
महिला बचत गटाच्या माध्यमातुन हजारो महिलांना आर्थिक व सामाजिक स्थान बळकट होण्यासाठी माझे नेहमी सहकार्य असते. कुठलीही शासकीय योजना नागरीकांपर्यंत पोहचावी यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी व माझ्या जनसंपर्क कार्यालयातुन आवश्यक ती कार्यवाही केली जाते. कोल्हे कुटुंब हे प्रत्येक घटकाला न्याय मिळावा व संकट कालीन परिस्थितीत आपण धावुन जावे या भुमीकेतुन सेवा करत असते. शासनाने राबविलेल्या योजना सामाजिक बदलासाठी उपयुक्त ठराव्या या दृष्टीने लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना मिळवुन देण्यासाठी माझा प्रयत्न आहे.
हजारो महिला नोंदणीसाठी संपर्क करत असुन त्यांना आवश्यक ते सहकार्य होण्यासाठी तळागळा पर्यंत आमचे प्रतिनिधी जावुन नोंदणी करुन घेत आहेत. प्रत्येकी दिड हजार रुपये अर्थ सहाय्य या योजनेव्दारे दरमहा महीलांना होणार आहे. मतदार संघातील माझ्या भगिनींसाठी प्रभावी पणाने योजनेची अमंलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनाने येणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी करुन वेगाने नोंदणी पुर्ण होण्यासाठी सहकार्य करावे असे कोल्हे म्हणाल्या आहे.
कोल्हे यांच्या माध्यामातुन ठिकठिकाणी सुरु करण्यात आलेल्या नोंदणी कक्षात येणाऱ्या भगिनींची “हक्काची बहीण आमच्या हक्कांसाठी” अशी बोलकी प्रतिक्रिया येत आहे.कोल्हे यांनी उभारलेल्या नोंदणी कक्षामुळे त्रास टळल्याने हजारो महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.