आपला जिल्हा

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी साजरी

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी साजरी
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी साजरी
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १५ एप्रिल २०२६सालाबादप्रमाणे याही वर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी करण्यांत आली. अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते आरतीसह धार्मिक विधी पार पडले.

जाहिरात
          प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिंडोरी प्रणित मोरेदादा यांच्या संकल्पनेतुन कारखाना कार्यस्थळावर २००६ मध्ये स्वामी समर्थ गुरूचरित्र पारायण सोहळ्यास सुरूवात करण्यांत आली. यंदाचे हे विसावे वर्ष होते. ९३ पारायणार्थी यात सहभागी झाले होते, तर वर्षभरातुन दोनदा याप्रमाणे ३९ पारायणे पार पडली. यात युवक युवतींसह महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

जाहिरात
          श्री. विवेकभैय्या कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आ.स्नेहलताताई कोल्हे यांनी अध्यात्माचा वसा देवुन आपणांसह युवकांना संस्काराची शिकवण दिली आहे. माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी प्रत्येक अध्यात्मीक कार्यात अलौकीक साथ देत प्रोत्साहन दिले आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने कार्यस्थळावर गणपती, नवरात्र उत्सव, ज्ञानेश्वरी, गुरूचरित्र, नवनाथ पारायणासह प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले प्रणित साप्ताहिक स्वाध्याय कार्य अव्यहतपणे सुरू आहे त्यासाठी प्रशस्त धार्मिक हॉलचे बांधकाम लवकरच सुरू करण्यांत येणार आहे. स्वामी समर्थ पुण्यतिथीतुन दैनंदिन संस्कार आचार-विचारांचे प्रदान होते, हल्लीच्या युवापिढीला त्याची जास्त गरज आहे.
          याप्रसंगी संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, अरूणराव येवले, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, ज्ञानदेव औताडे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, संजय औताडे, कामगार नेते मनोहर शिंदे, बाळासाहेब पानगव्हाणे, विलासराव वाबळे, सतिष आव्हाड, राजेंद्र कोळपे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, आप्पासाहेब दवंगे, मनेष गाडे, निवृत्ती बनकर, फकीरराव बोरणारे, कार्यकारी संचालक सुहास यादव, बापुसाहेब औताडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सीईओ शिव कुमार, तांत्रिक सल्लागार सीमांचल पांडा, संभाजीराव गावंड, रघुनाथ फटांगरे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कार्यकर्ते, कामगार आदि मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन चंद्रकांत जाधव यांनी केले. वसंत थोरात यांनी आभार मानले. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यांत आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे