राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाचा स्वानंद पवार तृतीय

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाचा स्वानंद पवार तृतीय
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाचा स्वानंद पवार तृतीय

Kopargaon vijay kapse दि १७ एप्रिल २०२६–लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वानंद पवार यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे, अशी माहिती प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त संदीपराव रोहमारे व वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे म्हणाले की, “उपरोक्त महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मराठी हिंदी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत स्वानंद पवार च्या ‘शाश्वत विकास : स्थिती आणि गती’ या विषयावरील मराठी माध्यमातील निबंधाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक १ हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.”

स्वानंद पवार याने यापूर्वी वाङ्मय मंडळाच्या वतीने विविध महाविद्यालयात आयोजित अनेक निबंध लेखन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून पारितोषिके प्राप्त केली आहेत. स्वानंद पवार यास प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, डॉ. जिभाऊ मोरे, प्रा संपत आहेर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्वानंद पवारच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, विश्वस्त संदीप रोहमारे, सचिव अॅड.संजीव कुलकर्णी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.



