अहिल्यानगरमध्ये विकासकामांना वेग उड्डाणपुलाची डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून पाहणी

अहिल्यानगरमध्ये विकासकामांना वेग उड्डाणपुलाची डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून पाहणी
अहिल्यानगरमध्ये विकासकामांना वेग उड्डाणपुलाची डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून पाहणी

Ahilyanagar vijay kapse दि ३० एप्रिल २०२६–अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची डॉ सुजय विखे पाटील यांनी सखोल पाहणी केली. शहराच्या वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सह्याद्री चौक ते सनफार्मा चौक दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या कामकाजाची त्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान उड्डाणपुलाच्या बांधकामाची सद्यस्थिती, कामाचा वेग तसेच गुणवत्ता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. प्रकल्प नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार असून, नागरिकांना अधिक सुलभ व जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.