आपला जिल्हा

अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेची कार्यकारणी ना .उदय सामंत यांनी केली बरखास्त

अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेची कार्यकारणी ना .उदय सामंत यांनी केली बरखास्त

तक्रारी वाढल्याने शिवसेनेच्या आढावा बैठकीत घेतला निर्णय तर प्रभारी म्हणून जिल्हाप्रमुखांकडे जबाबदारी कायम 

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ७ मे २०२६-  महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा संपर्क मंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर शिर्डी राहुरी नेवासा व श्रीरामपूर येथे शिवसेना आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीदरम्यान त्यांनी तालुका व जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यात त्यांना कामकाजाबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. पक्ष संघटना वाढवण्यासाठी कार्यकारणीवर असलेले पदाधिकाऱ्यांनी कुचराईपणा व बेबनाव केला व सातत्याने तक्रारी वाढल्याने त्यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेची सर्व अंगीकृत संघटने सह कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा केली मात्र नवीन कार्यकारिणी निवड होई पर्यंत प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नितीनराव औताडे, कमलाकर कोते, बाबुशेठ टायरवाले व अनिल शिंदे यांच्यावर जबाबदारी कायम ठेवली आहे.

जाहिरात

आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या जोमाने व ताकदीने काम करण्याच्या सूचना उदय सामंत यांनी शिवसैनिकांना दिल्या. त्यांनी जिल्ह्यातील युवासेना, शिवसेना, महिला आघाडी , शेअर व ग्रामीण सर्व अंगीकृत कार्यकारिणी बरखास्त करण्याचे निर्देश दिले.

जाहिरात

लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीस आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना नेते सागर बेग, जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, प्रवक्ता संजीव भोर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे