विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी– काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी– काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्यांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैव; संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेध

Sangmner vijay kapse दि ९ मे २०२६—वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना समवेत घेऊन जाणारा मानवतेचा विचार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी अशा कठीण काळात हा विचार पुढे नेण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण दिली. विकास लवांडे यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया वारकरी विचारांचे पाईक तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

संत परंपरेचा समतेचा विचार सांगणारे विकास लवांडे यांच्यावर तथाकथित संग्राम भंडारे यांनी आळंदी येथे शाईफेक हल्ला केला या घटनेचा तीव्र निषेध करून मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे .मात्र या हल्ल्याला ते धीरोदत्तपणे सामोरे गेले आहे. संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले यांनी अशा कठीण काळात आपला विचार जोपासण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. हा विचार पुढे घेऊन जाताना पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणाऱ्यांवर होणारे हल्ले हे चिंताजनक आहे. यापूर्वी प्रवीण गायकवाड, हनुमंत पवार यांच्यावरही असे हल्ले झाले. आणि आता विकास दादा लवांडे यांच्यावर ही हल्ला झाला आहे. झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे.

खरे तर प्रतिवाद करायला त्यांना संधी आहे. ते सांगू शकतात की आमचे वारकरी विचार असे आहेत. आणि त्यांनी ते सांगितले पाहिजे. मात्र तसे न करता हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.
दुर्दैवाने शासन त्यांना पाठीशी घालते आहे हे वाईट आहे. महाराष्ट्राच्या विचार झालेला धक्का लावणाऱ्यांना सरकारने पाठीशी घालत आहे. वारकरी संप्रदायातील सर्वांनी अत्यंत जागृतपणे या घटनेकडे अत्यंत जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे. विचारातून प्रतिवाद करा. पण प्रतिवाद न करता, विचार न मांडता हल्ला करणे हे अत्यंत चुकीची पद्धत आहे . आणि अशा लोकांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैवाचे असल्याचे टीका मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे..




