आपला जिल्हा

पंढरीची वारी जगाला समतेचा संदेश देणारी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

पंढरीची वारी जगाला समतेचा संदेश देणारी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

पंढरीची वारी जगाला समतेचा संदेश देणारी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १९ जुलै २०२६ : महाराष्ट्राच्या आषाढी वारीला शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा लाभली असून, या वारीत विविध जाती-धर्मातील लाखो वारकरी एकत्र येतात. ‘माऊली’ या एका शब्दाने सर्वांना जोडणारी ही वारी प्रेम, बंधुता, मानवता आणि समतेचा संदेश जगाला देणारी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

जाहिरात

वडगाव लांडगा येथे शांताराम लांडगे यांच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडी सोहळ्याला शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी निवृत्ती यशवंत लांडगे, देविदास शिंदे, अशोक लांडगे, डी. एम. लांडगे, संजय लांडगे, नवीन शिंदे, बाळासाहेब लांडगे, भाऊसाहेब मुकुंदा लांडगे, विश्वास लांडगे, आनंद वर्पे, अरुण लांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी व भाविक उपस्थित होते.

जाहिरात

थोरात म्हणाले की, वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत जनाबाई, मीराबाई आदी संतांनी मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला. जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन प्रत्येकाने माणूस म्हणून एकमेकांचा सन्मान करावा, हीच वारकरी संप्रदायाची शिकवण आहे.

वारकरी संप्रदायात अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला स्थान नसून, संतांनी त्याविरोधात संघर्ष केला. अनेक संतांना तत्कालीन धर्ममार्तंडांकडून छळ सहन करावा लागला, तरी त्यांनी समतेचा मार्ग सोडला नाही. पंढरपूरचा विठ्ठल हा सर्व भक्तांचा असून आषाढी वारीचा सोहळा भक्तिभाव आणि उत्साहाने साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी वारी हे महाराष्ट्राचे जागतिक स्तरावरील अद्वितीय सांस्कृतिक वैभव असून, लाखो वारकरी कोणत्याही भेदभावाशिवाय एकत्र येऊन विठ्ठल नामाचा गजर करतात. एवढ्या मोठ्या संख्येतील भाविकांची व्यवस्था सहजतेने होत असल्याने हे जगासाठी आश्चर्य असल्याचेही थोरात यांनी नमूद केले. वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार जपण्याचे आवाहन करताना त्यांनी धर्माच्या नावावर होणारे राजकारण दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक लांडगे यांनी केले, तर आयोजक शांताराम सदाशिव लांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे