के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित फार्मासिट्युकल कंपनीत निवड

के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित फार्मासिट्युकल कंपनीत निवड
के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नामांकित फार्मासिट्युकल कंपनीत निवड

Kopargaon vijay kapse दि १३ मे २०२६–गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने प्लेसमेंट क्षेत्रात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयात नुकताच Kinomera Biosciences Pvt. Ltd. या नामांकित फार्मासिट्युकल कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह उत्साहात पार पडला. या प्रक्रियेत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील एम. एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री च्या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली”, आहे अशी माहिती प्राचार्य प्रा. (डॉ.) विजय ठाणगे यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. टी. ढोकळे म्हणाले की, “सदर प्लेसमेंट प्रक्रियेत अमोल वाबळे, प्रतीक रोहमारे, राकेश बोरसे, ऋषिकेश सालमुठे, वैभव गायकवाड, साईनाथ जेजुरकर, विशाल गायकवाड व अण्णासाहेब सोमासे या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली असून या विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान, प्रयोगशाळेतील कौशल्य तसेच मुलाखतीतील आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे”.

महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू, करिअर मार्गदर्शन आणि संशोधनाभिमुख शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय शिक्षणाबरोबरच उज्ज्वल करिअर घडविणारे केंद्र बनत असल्याची भावना देखील याप्रसंगी पालकांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपभाऊ रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) विजय ठाणगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

या प्लेसमेंट प्रक्रियेसाठी कंपनी हेड मा. ज्ञानेश्वर पाचरणे व अभिजित घोगरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच हा प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन. टी. ढोकळे, प्रा. एस. एस. नागरे, डॉ. एस. जी. कोंडा, प्रदीप शेलार, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा.(डॉ) आर. ए. जाधव. प्रा. विजय सोमासे, प्रा. नेहा गुरावे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय प्रा. (डॉ.) गणेश शिंदे, आणि कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, महाविद्यालयातील सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता, उत्कृष्ट निकाल, आधुनिक प्रयोगशाळा, करिअर मार्गदर्शन व वाढत्या प्लेसमेंट संधी पाहता विद्यार्थ्यांनी के. जे. सोमैया महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपले उज्ज्वल भविष्य साकार करावे, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



