अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरू

अमृतवाहिनी तंत्रनिकेतन मध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरू
प्रवेश प्रक्रिया व फॅसिलिटी सेंटरला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Sangmner vijay kapse दि २४ मे २०२६– अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी तंत्रनिकेतन, संगमनेर येथे शैक्षणिक वर्ष २०२६ – २७ साठी डिप्लोमा प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मार्गदर्शन व फॅसिलिटी सेंटरची सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमास विद्यार्थ्यांचा व पालकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य प्रा.व्ही.बी.धुमाळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने सातत्याने विविध उपक्रम राबवले असून विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी निर्माण करून दिल्या आहेत. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याशी असलेल्या समन्वयामुळे मागील वर्षीच्या 627 विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजवर नोकऱ्या मिळाल्या आहेत.

येणाऱ्या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रियेची मुदत 22 जून पर्यंत आहे. या फॅसिलिटी सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना शाखा निवड मार्गदर्शन, ऑनलाईन अर्ज भरणे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण मार्गदर्शन तसेच करिअर संदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना योग्य शाखा निवड करून प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे समन्वयकांनी सांगितले.

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक वर्ग, उत्कृष्ट प्लेसमेंट सुविधा तसेच उद्योगाभिमुख शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सदर फॅसिलिटी सेंटर प्राचार्य प्रा.व्ही.बी.धुमाळ व उपप्राचार्य प्रा.जी.बी.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा.एस.एस.तळेकर, प्रा.आर.के. सातपुते व त्यांच्या टीम मेंबर्स तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा.व्ही.डी. कांडूरे, प्रा.ए.एस.दिघे व त्यांच्या टीम मेंबर्स यांच्या मार्फत प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यात येत आहे.



