आपला जिल्हा

संजीवनी पॉलीटेक्निकच्या प्लेसमेंट पॅटर्नचे यश; सिव्हिल इंजिनिअरींगच्या १७ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

संजीवनी पॉलीटेक्निकच्या प्लेसमेंट पॅटर्नचे यश;
सिव्हिल इंजिनिअरींगच्या १७ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

संजीवनी पॉलीटेक्निकच्या प्लेसमेंट पॅटर्नचे यश;
सिव्हिल इंजिनिअरींगच्या १७ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २६ मे २०२६: संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकचा प्लेसमेंट पॅटर्न पून्हा सिध्द झाला. सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील एकाच वेळी सतरा विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नामांकित कंपन्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ घडवीण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न होत असल्याने संजीवनीची ही घोडदौड सुरू आहे.

जाहिरात

या सतरा विद्यार्थ्यांना काळोखे आरएमसी या नामांकित कंपनीने चांगला पगार देऊ करीत नोकरीची संधी दिली. संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे यात मोठे योगदान आहे. या निवडीमुळे अन्य विद्यार्थ्यांत देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांत रविंद्र हेम्बाडे, मनोज हुळुले, अक्षय मडके, दर्शन शिंदे , साईरात शिंदे , शिवम कोकरे, प्रणव कवडे, समर्थ सोनवणे, प्रथमेश थोरात, ओम मढे, विशाल शिंदे, आयुश यादव, सौरभ बनकर, श्रावणी सोनजे, नम्रता रणशूर, सचिन घाडगे व वेदांत बनसोडे यांचा समावेश आहे.

जाहिरात

या बाबत माहिती देताना प्राचार्य ए.आर. मिरीकर म्हणाले, परीपूर्ण शिक्षण आणि चांगली नोकरी मिळावी, हे प्रत्येक विद्यार्थ्याचे आणि त्यांच्या पालकाचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक सातत्याने प्रयत्न करते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, तज्ञांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच प्रभावी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट आदि उपक्रम राबविले जातात. ‘संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश म्हणजे हमखास नोकरी’ हे समीकरण आता रूढ झाले आहे.

जाहिरात

संस्थेचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नंस डॉ. आर.एस.शेंडगे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची टीम उपस्थित होती.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संजीवनी पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा नोकरीसाठी निवड झाल्याबध्दल सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र. यावेळी प्राचार्य मिरीकर, डॉ. शेंडगे , आदी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे