आपला जिल्हा

अनुकूल काळात प्रतिकूल काळाचा विसर पडल्यास अहंकार वाढतो : मा आ स्नेहलता कोल्हे

अनुकूल काळात प्रतिकूल काळाचा विसर पडल्यास अहंकार वाढतो : मा आ स्नेहलता कोल्हे
अनुकूल काळात प्रतिकूल काळाचा विसर पडल्यास अहंकार वाढतो : मा आ स्नेहलता कोल्हे
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ जुन २०२६येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवबाबा वाघ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचवा साहित्य कलाकृती पुरस्कार’ वितरण सोहळा गुरुवार, दि. ४ जून २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.यावेळी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी या सोहळ्यास राज्यभरातून मोठ्या संख्येने साहित्यिक सहभागी झालेले होते.

जाहिरात
यावेळी मनोगत व्यक्त करताना स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की,.स्व. शहादू वाघ हे संजीवनीचे माजी कर्मचारी म्हणून कार्यरत होते.त्यांचा पिंड कवी, लेखकाचा असल्याने त्यांनी कुटुंबाचा गाडा ओढत आपला छंद जोपासला. सन १९८०-८५ च्या दरम्यान सौदी अरेबिया येथे जाऊन नोकरी केली, ग्रामीण भागातील या व्यक्तीने त्या वेळी विमानप्रवास केला, याचा कुटुंबाला गर्व वाटतो.आपल्या वडिलांची साहित्याची आवड जपत दरवर्षी राज्यभरातील साहित्यप्रेमींचा सन्मान करणाऱ्या वाघ परिवाराचे कौतुक करावे तितके कमीच आहे.अशा प्रकारच्या पुरस्कारांमुळे साहित्यिकांचा हुरूप आणि उत्साह वाढतो.केवळ या वर्षीच नाही तर गेल्या 5 वर्षापासून वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अशा कार्यक्रमाचे आयोजन करतात, आणि आपल्या या ग्रामीण परिसराला साहित्याची मेजवानी देतात सामाजिक साहित्य आणि संस्कृती जपणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असून भविष्यातही शिवबाबा वाघ प्रतिष्ठानने असेच समाजोपयोगी उपक्रम राबवावेत.त्या पुढे म्हणाल्या,युवा नेते, आमदार विवेक भैय्या कोल्हे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या संजीवनी कोविड सेंटर मध्ये योग्य व वेळेत उपचार मिळाले, परंतु दुर्दैवाने शहादूबाबा वाघ यांचा स्कोअर वाढत गेला, पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले, मुलांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, परंतु ४ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.म्हणून प्रत्येक ४जून रोजी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ साहित्यातील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जाहिरात
वाघ कुटुंबीय जन्माने नाशिक जिल्ह्यातील असले तरी सर्व कुटुंबीयांची कर्मभूमी कोपरगाव येथील संजीवनी उद्योग समूह असून याच समूहाने आमच्या जगण्याला बळ दिले.कुटुंबाला आधार दिला, ही कृतज्ञता वाघ परिवारातील सदस्य व्यक्त करतात. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे यासाठी साहित्याची नितांत गरज आहे. माणसातील ‘माणूसपण’ जपण्याचे मोलाचे कार्य साहित्यिक करत असतात. या निमित्ताने उपस्थित सर्व कवी, लेखक, साहित्यप्रेमी तसेच महिला साहित्यिकांचे विशेष अभिनंदन करते. अहंकार वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अनुकूल काळात प्रतिकूल परिस्थितीचा विसर पडल्यास अहंकार वाढीस लागतो आजच्या काळात पुस्तक वाचनाचे प्रमाण कमी होत असून स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकजण मोबाईलमध्ये इतके गुंतले आहेत की दूरच्या व्यक्तींशी तासन्तास संवाद साधतात; मात्र समोर बसलेल्या माणसाशी संवाद साधण्याचे प्रमाण कमी झाले आहे. विज्ञानाची प्रगती स्वीकारताना त्याचे आहारी जाऊ नये,याची जाणीव समाजाने ठेवणे आवश्यक आहे.असे आवाहन त्यांनी केले.यावेळी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कवी, गझलकार यांना स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

जाहिरात
प्रशांत वाघ म्हणाले की,वाघ कुटुंबीय जन्माने नाशिक जिल्ह्यातील असले तरी सर्व कुटुंबीयांची कर्मभूमी कोपरगाव येथील संजीवनी उद्योग समूह असून याच समूहाने आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवून जगण्याला बळ दिले.. कुटुंबाला आधार दिला असून आज रोजी त्यांनी दिलेले संस्कार आमचे वाघ कुटुंबीय जपत आहे. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांनी सामाजिक जाणीव जपण्याचे विचार दिले ते आदर्शवत म्हणून आम्ही काम करतो आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवबाबा वाघ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका अंजनाबाई वाघ, उपाध्यक्षा यमुनाताई गोतीस, अध्यक्ष संजय वाघ, सचिव राजेश वाघ, अवर सचिव डॉ. नंदकुमार राऊत, प्रा. दादासाहेब कोते, प्रा. सुभाष सोनवणे, रज्जाक शेख, वाघ परिवारातील सदस्य, साहित्यिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे