आपला जिल्हा
Related Articles
Check Also
Close
सह्याद्री विद्यालयात नवगत विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष मैथिली तांबे यांच्याकडून स्वागत

यावेळी सौ मैथिली तांबे म्हणाल्या कि , “शाळा हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर असते. शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांनीही संगमनेरच्या मातीत रुळावे. सह्याद्री विद्यालय हे संगमनेरचे भूषण असून येथून अनेक कर्तृत्ववान व्यक्ती घडल्या आहेत. चुका झाल्या तरी खचू नका, कारण चुकांमधूनच शिकायला मिळते. मोबाईल व टीव्हीचा वापर मर्यादित ठेवा. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक मैदानी खेळ व एक छंद जोपासावा. योग्य आहार व पुरेशी झोप यामुळे शरीर व मनाचा विकास होतो.” त्यांनी पालक, शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करून विद्यालयात सुरक्षित व आनंददायी वातावरण असल्याचे नमूद केले.

एस.एम. खेमनर म्हणाले की, सहकार महर्षी आदरणीय भाऊसाहेब थोरात (दादांनी ) बहुजन समाजाच्या मुलांसाठी या संस्थेची स्थापना केली. माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात , मा आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची व विद्यालयाची प्रगती चालू आहे. विद्यालयाच्या अडचणी सोडविणे कामी आ. सत्यजित दादा तांबे यांचे सहकार्य लाभते. नगराध्यक्ष मैथिली तांबे व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांचेही मोलाचे सहकार्य मिळत असते .या विद्यालयामध्ये पाचवी ते दहावी पर्यंत 2000 पेक्षा जास्त मुलं शिक्षण घेतात. इथे मुलांची गुणवत्ता व संस्कार यांना महत्त्व दिले जाते”. नव्या विद्यार्थ्यांमुळे विद्यालयाला नवी ऊर्जा मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यामधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्याला वाव देण्याचे काम इथले शिक्षक सदैव करत असल्याचेही ते म्हणाले
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
