संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजने महाराष्ट्राची शान वाढविली- ना.दादा भुसे

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजने महाराष्ट्राची शान वाढविली- ना.दादा भुसे
संजीवनीच्या शिष्ट मंडळाशी चर्चेदरम्यान शिक्षणमंत्री ना. दादा भुसे यांचे गौरवोद्गार

Kopargaon vijay kapse दि १९ जुन २०२६: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय राष्ट्रीय ब्रासबॅण्ड भव्य महाअंतिम फेरीच्या स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या ब्रासबॅण्ड पथकाच्या कलाकारांनी पश्चिम भारत विभागाचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकावून देश पातळीवर आपली गुणवत्ता व शिस्त सिध्द केली आहे, ही बाब देशात महाराष्ट्राची शान वाढविणारी आहे, असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांनी काढले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांचे पुढाकरात संजीवनीच्या शिष्ट मंडळाने शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांच्या ‘जंजिरा’ या शासकीय निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व त्यांच्या उपलब्धींची माहिती सुमित कोल्हे यांनी दिली. यावेळी मंत्री भुसे यांनी संजीवनीची प्रशंसा केली. तर कोल्हे यांनी सांगीतले की संजीवनी परीवाराने मागील अनेक वर्षांपासून शिक्षणासोबतच शिस्त , नेतृत्व, राष्ट्रीय मुल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधणारी शिक्षण संस्कृती विकसीत केली आहे.

यावेळी मंत्री श्री भुसे यांनी महाराष्ट्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत जिल्हा परीषद शाळांमध्ये सैनिकी प्रशिक्षणाचे घटक समाविष्ट करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे सांगीतले. संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्य. काॅलेजच्या प्रशिक्षित कॅडेटस्नी परीसरातील जिल्हा परीषद शाळांना भेटी देवुन तेथिल विध्यार्थ्यांना प्राथमिक परेड आणि सैनिकी शिस्तीचे मुलभुत तत्वे शिकवावीत, अशी सुचना केली. या माध्यमातुन विद्यार्थ्यांमध्ये शिस्त , राष्ट्रप्रेम , नेतृत्वगुण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सुचनेची अंमलबजावणीची कोल्हे यांनी ग्वाही दिली.
या भेटी दरम्यान सैनिकी शाळा चालविताना संस्थांना भेडसावणाऱ्या विविध प्रशासकिय व पायाभुत अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. यावर मंत्री श्री भुसे यांनी राज्यातील सैनिकी शाळांच्या विकासासाठी शासन स्तरावर आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मंत्री दादा भुसे यांच्या भेटीत सुमित कोल्हे यांचे सह प्राचार्य के. एल. दरेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.



