शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे अनुदान तातडीने मिळावे – भास्करराव पानसरे
रात्रीचे वेळी लोड शेडिंग बंद करा

Sangmner vijay kapse दि २१ जुन २०२६- पावसाळा सुरू होऊन पाऊस पडत नाही. कर्जमाफीची फसवी घोषणा झाली कर्जमाफी मिळत नाही. अनुदानाच्या घोषणा होऊन अद्याप कृषी अवजारांची अनुदान मिळाले नाही. शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने तातडीने कृषी अवजारांचे अनुदान द्यावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा घुलेवाडी गावचे माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सरकारला प्रश्न विचारताना भास्करराव पानसरे म्हणाले की, सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आले आहे. संपूर्ण कर्जमाफी करण्याची आश्वासन दिले आणि आता मात्र कोणतीही कर्जमाफी मिळत नाही. शेतकऱ्यांना अवजारे दिली त्यावर अनुदान देणे गरजेचे आहे.
अनुदान देण्याची घोषणा करूनही अद्याप एक रुपया अनुदान मिळाले नाही त्यामुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहे. वेळेवर लाईट मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये दररोज रात्री चार तास लोड शेडिंग ठेवले आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये लोड शेडिंग बंद करा. रात्रीची कमीत कमी वन फेज लाईट सर्वत्र सुरू पाहिजे.

अडचणीचे दिवस आहेत शेतकरी सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. पाऊस नाही अशा सर्व परिस्थितीमध्ये सरकारने भांडवलदारांकडे लक्ष न देता शेतकरी व गोरगरिब माणसाकडे लक्ष दिले पाहिजे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्ष मोठ्या कष्टातून संगमनेर तालुका उभा केला. सर्व क्षेत्रांमध्ये आज तालुक्याचा नावलौकिक आहे मात्र मागील दोन वर्षांमध्ये काही लोकांनी नाव घालवण्याचा प्रयत्न केला. संगमनेर तालुक्याचे पाणी पळवले लाईट मिळत नाही रेल्वे पळवली ही सर्व चूक संगमनेर तालुक्यातील जनतेच्या लक्षात आली असून तातडीने सरकारने सुधारणा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते भास्करराव पानसरे यांनी दिला आहे.




