सूर्यकांत पवार एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या दक्षिण महाराष्ट्र प्रमुख पदी
सूर्यकांत पवार एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या दक्षिण महाराष्ट्र प्रमुख पदी
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २१ जुन २०२६-नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तालुक्यातील संवत्सर येथील सूर्यकांत नारायण पवार यांची नुकतीच संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सुमित्रा पवार यांच्या आदेशाने संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.सूर्यकांत पवार यांनी दक्षिण महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी निवड केली आहे.
जाहिरात
कन्नड येथे १९ जून रोजी झालेल्या संघटनेच्या राज्य पदाधिकारी बैठकीत संवत्सर येथील सूर्यकांत पवार यांची निवड करण्यात आली असून याप्रसंगी संस्थापक अध्यक्षा सुमित्रा पवार, कार्याध्यक्ष ॲड. सूर्यकांत पवार, सचिव किशोर पवार, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख दिपाली बांड आदींच्या शुभहस्ते पवार यांना नियुक्तीपत्र देत समाजातील वंचित शोषित व आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय कार्य करत तळागाळातील समाजाकरिता समाजपयोगी कार्य करत राहावे अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.जाहिरात
तर नवनियुक्त संघटनेचे दक्षिण महाराष्ट्र प्रमुख सूर्यकांत पवार यांनी संघटनेचे संस्थापक, कार्याध्यक्ष, सचिव, ज्येष्ठ पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करत आपण सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन संघटना तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.