आपला जिल्हा

 वैद्यकीय सुविधेत संजीवनी व आर जे एसचे कार्य सेवाभावी – नगराध्यक्ष पराग संधान

 वैद्यकीय सुविधेत संजीवनी व आर जे एसचे कार्य सेवाभावी – नगराध्यक्ष पराग संधान
 वैद्यकीय सुविधेत संजीवनी व आर जे एसचे कार्य सेवाभावी – नगराध्यक्ष पराग संधान
Kopargaon vijay kapse दि २१ जुन २०२६हल्लीच्या ताण तणावामुळे भारतीयांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे, सशक्त युवापिढी मैदानावर खेळत असतांना त्यांच्या अकाली मृत्युचे प्रमाण गंभीर आहे तेंव्हा प्रत्येकाने आरोग्याच्या काळजीपोटी नियमीत तपासण्या केल्याच पाहिजे. संजीवनी, आर. जे. एस. हॉस्पीटलच्या सहकार्यातून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी मनोगत व्यक्त केले.

जाहिरात
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पीटल, संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारभूषण बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त सर्वरोग निदान आरोग्य, रक्तदान शिबीर व मोफत औषधांचे वाटप कार्यक्रम व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे रविवारी आयोजित करण्यांत आले होते त्याचे उद्‌घाटन करतांना ते बोलत होते.

जाहिरात
प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव, कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पीटल कोपरगांव (बेट) चे डॉ. साहिल माळी यांनी विविध आजार व त्यासंबंधीच्या उपचाराची माहिती देऊन आर.जे.एस हॉस्पीटलमध्ये शासनाच्या सहकार्याने कर्करोगावरील वैद्यकिय उपचार चांगल्या प्रकारे केले जातात; तेव्हा कर्करोगग्रस्त रुगणांनी या आधुनिक उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

जाहिरात
पराग संधान पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांचा वाढदिवस सेवा हाच धर्म या माध्यमातून सर्वत्र साजरा होत आहे. लहान मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी त्यांनी जवळके येथे महिनाभर निवासी शिबीर राबवून त्यांना पोषण आहार पुरवला होता. हल्ली मधुमेह-हृदयविकार, कर्करोग, संसर्गजन्य आजार क्षयरोग, तापजन्य आजार, श्वसनाचे विकार, कुपोषण, गर्भवती स्त्रीयांचे आजार, आदींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावरील वैद्यकिय उपचार मध्यमवर्गीना परवडत नाही त्यामुळे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे संकल्पनेतून आम्ही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाचे निमीत्ताने गोर-गरीब, दीन दलित, दिव्यांग आजारी रुग्णांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित करून रुग्णांच्या दारापर्यंत वैद्यकिय सेवा पुरविण्याचा प्रयत्न करतो.
आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोल्ह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे माध्यमातून त्यासाठी सहकार्य देतात, संजीवनी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधेसाठी फिरता दवाखाना सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे असेही ते शेवटी म्हणाले.
          याप्रसंगी डॉ. चैतन्य खानोलकर (अस्थिरोग तज्ञ) डॉ. प्राजकता निराली (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. सायली ठोंबरे (मेडिसिन), डॉ. वर्षा हिवाळे, डॉ. मेहेरबान सिंग (नेत्ररोग तज्ञ), डॉ. साहिल माळी (कर्करोग तज्ञ), डॉ. अनिरुध्द उबाळे (जनरल फिजीशियन), डॉ. त्रिवेणी आहेर (दंतरोगतज्ञ), डॉ. समिन पाटील (जनरल फिजिशियन), डॉ. सचिन काळे (पंचकर्म), डॉ. योगिता पाटील (संजीवनी ब्लड बँक),डॉ. नारायण पाटील (आयुर्वेद), डॉ. स्नेहल भोकरे (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. राजेश माळी (जनरल सर्जन), डॉ. मयूर गंगवाल (मूत्रविकार तज्ञ), डॉ. अनंत कुमार भांगे (बालरोग तज्ञ) महेश रक्तारे, गणेश रोठे आदिचा सत्कार करण्यांत आला.

जाहिरात
याप्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर,आरोग्य सभापती वैभव आढाव,राजेंद्र सोनवणे, विशाल गोर्डे, दिलीपभाऊ दारुणकर, बाळासाहेब नरोडे,अतुलशेठ काले,विनोद राक्षे, संजय उदावंत, गोपीनाथ गायकवाड,सुरेश बोळीज,संतोष गंगवाल,राजेंद्र बागुल,कैलास मंजूळ,रवींद्र रोहमारे, आकाश वाजे,प्रकाश सांगळे,मुकुंद उदावंत, सिद्धार्थ साठे, सतीश देवकर, जालिंदर संवत्सरकर, कैलास सोमासे,कलविंदर डडियाल,रोहित कणगरे, पप्पू देवकर, राकेश काले,सचिन त्रिभुवन, दीपक जपे, चैतन्य जगदाळे, सुनील कुंडारे, योगेश गंगवाल, निसार शेख, सतीश निकम, राहुल खरात, संतोष शेजवळ, विजय चव्हाणके, चंद्रकांत वाघमारे, धनंजय आढाव, इरफान कुरेशी, शैलेश नागरे, नानासाहेब साळवे, फकीर मोहम्मद पहिलवान, रोहिदास पाखरे, दत्तात्रेय डोखे, इलियासभाई खाटिक, जितेंद्र दिवेकर, किरण आव्हाड, मनोज निलक, सचिन सावंत, रविराज पाखरे, विजय मुंगसे, खलिकभाई कुरेशी, अमर नरोडे, सलीम पठाण, रवींद्र सानप आणि राजेंद्र गंगुले उपस्थित होते यासह संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक, कार्यकर्ते, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, रुग्ण, महिला भनिनी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे