आपला जिल्हा

रयतच्या रामेश्वर विद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार- ॲड. संदीप वर्पे 

रयतच्या रामेश्वर विद्यालयाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार- ॲड. संदीप वर्पे 
रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल पदी निवड झाल्याबद्दल ॲड. संदीप वर्पे व सुरेशराव बोळीज यांचा सन्मान सोहळा उत्साहात
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ जुलै २०२६-: ग्रामीण व गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. श्री रामेश्वर विद्यालयाची काही वर्षांपूर्वी घटलेली विद्यार्थीसंख्या आता पुन्हा वाढू लागणे ही सकारात्मक बाब आहे. 

     उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी उत्तर विभागासाठी पहिल्याच वर्षी पाच कोटी रुपयांचा सीएसआर निधी आणण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, हा निधी दुर्बल शाखांच्या विकासासाठी वापरणार आहे. त्यामुळे संस्थेच्या उत्तर विभागामार्फत श्री रामेश्वर विद्यालयाचा ‘दुर्बल शाखा’ म्हणून समावेश करून विद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक ती आर्थिक व भौतिक मदत करण्यात येईल, अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ॲड. संदीप वर्पे यांनी दिली.

जाहिरात
     कोपरगाव तालुक्यातील वारी येथील श्री रामेश्वर विद्यालयात शुक्रवारी (दि.3) रयत शिक्षण संस्था, सातारा हिचे नवनिर्वाचित मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड. संदीप वर्पे व सुरेशराव बोळीज यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान सोहळा तसेच गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित दोन्ही मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तसेच माजी सभापती मच्छिंद्र टेके पाटील होते.

जाहिरात
     यावेळी व्यासपीठावर मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुरेशराव बोळीज, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष रोहित टेके, सदस्य ॲड.शरद जोशी, मुख्याध्यापक शरीफ शेख, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, सामाजिक कार्यकर्ते रामदास सोनवणे, माजी पं.स.सदस्य अशोकराव कानडे, शिवव्याख्याते डॉ. सर्जेराव टेके, माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे, ग्रा.प.सदस्य दौलत वाईकर, दिनेश निकम,परसराम टेके, माजी विद्यार्थी संघांचे उपाध्यक्ष अरविंद गोर्डे, सचिव संजय कर्पे, नानासाहेब टेके, स्मिता काबरा, नानी ठोंबरे, वसंतराव गोरे, वसंत टेके, माजी मुख्याध्यापक छबुराव पाळंदे सुधाकर साळुंके, देवराम शेंडे, ऋतुराज काळे उपस्थित होते.
      मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुरेशराव बोळीज म्हणाले, मी याच शाळेत ज्ञानदानाचे कार्य करुन अनेक विद्यार्थी घडविले आहे. या शाळेच्या विकासाकरिता तत्परतेने पाठपुरावा करून आवश्यक ती मदत करु शासन शिक्षक भरती वेळेवर करत नसल्याने संच मान्यातेनुसार रिक्त असणाऱ्या पदावर देखिल शिक्षक उपलब्ध होत नाही. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्थेने शाखा पातळीवर सेवक नियुक्ती सोय केलेली आहे.आर्थिक दुर्बल गटातून साहाय्य मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
    यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शरीफ शेख यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष पत्रकार रोहीत टेके यांनी करून शाळेच्या विकासाकरिता आवश्यक असलेल्या बाबी सर्वांना निदर्शनास आणुन दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यालयाची मागील काळातील परिस्थिती व बिकट प्रसंगात संस्थेने केलेली कामगिरी अत्यंत कळकळीने सर्वांसमोर मांडली.

जाहिरात
    या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक छाबुराव पाळंदे, सुधाकर साळुंके, काकासाहेब गवळी, देवराम शेंडे, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, मच्छिंद्र गांगड, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य रोहित टेके, मच्छिंद्र टेके, विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक, शरीफ शेख, जेष्ठ उपक्रमशील शिक्षक कैलास शेळके, वसंत जाधव, सिताराम झुराळे, तुकाराम जेठे, रविंद्र रासकर, लिपिक शिवाजी धट, सुरेश जमदडे यांनी केलेल्या लोकवर्गणीतून विद्यालयातील सुमारे 70 गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वितरित करण्यात आले. 
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांसह शिक्षिका योगिता कर्डेल, शालिनी कर्पे,अनिसा पठाण, विजय थोरात यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व पालक, महीला आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. गोरख टेके यांनी आभार मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे