आपला जिल्हा

जुलै फॉर काइंडनेस उपक्रमातून तालुक्यात दयाळूपणा व आदरभावाची रुजवात; यशोधनमधील ‘काइंडनेस ट्री’ला विद्यार्थ्यांच्या सेवाभावी कृतींची बहर

जुलै फॉर काइंडनेस उपक्रमातून तालुक्यात दयाळूपणा व आदरभावाची रुजवात; यशोधनमधील ‘काइंडनेस ट्री’ला विद्यार्थ्यांच्या सेवाभावी कृतींची बहर

जुलै फॉर काइंडनेस उपक्रमातून तालुक्यात दयाळूपणा व आदरभावाची रुजवात; यशोधनमधील ‘काइंडनेस ट्री’ला विद्यार्थ्यांच्या सेवाभावी कृतींची बहर

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १७ जुलै २०२६ : समाजातील वाढती नकारात्मकता दूर करून एकमेकांप्रती आदर, जिव्हाळा आणि आत्मीयता वाढविण्याच्या उद्देशाने कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मंथ ऑफ काइंडनेस’ उपक्रमाला नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत यशोधन जनसंपर्क कार्यालयात उभारण्यात आलेल्या काइंडनेस ट्री’ वर विद्यार्थ्यांनी दिवसभरात केलेल्या दयाळूपणाच्या कृतींची नोंद करून उपक्रमाला वेगळीच उंची मिळाली आहे.

जाहिरात

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात तयार करण्यात आलेल्या काइंडनेस ट्रीवर विद्यार्थी व युवकांनी केलेल्या सेवाभावी कृतींची पाने चिटकवण्यात आली. चिमण्या व पक्ष्यांना दाणा-पाणी देणे, वृद्धांना मदत करणे, आई-वडिलांना घरकामात हातभार लावणे, प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधणे, गरजूंना मदत करणे, आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे तसेच पक्षी-प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अशा विविध कृतींचा यात समावेश आहे.

जाहिरात

या उपक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असून त्यांच्या सकारात्मक कृतींमुळे पालकांनाही आनंददायी अनुभव मिळत असल्याचे दिसून आले. तसेच पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शविण्यासह विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचीही नोंद काइंडनेस ट्रीवर करण्यात आली.
याबाबत बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, “दूरदर्शन आणि सामाजिक माध्यमांवर सातत्याने नकारात्मक बातम्यांचा भडिमार होत असतो. त्यामुळे समाजात प्रेम, जिव्हाळा, मानवता आणि परस्परांप्रती आदरभाव वाढविण्यासाठी ‘मंथ ऑफ काइंडनेस’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. छोट्या-छोट्या चांगल्या कृतींमधून मोठा आनंद निर्माण होतो. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक सलोखा आणि दयाळूपणाची भावना रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

जाहिरात

संगमनेर तालुक्याने विकास, सहकार आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या परंपरेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याच परंपरेला पुढे नेत डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतील ‘मंथ ऑफ काइंडनेस’ हा उपक्रम समाजात सकारात्मकता, मानवता आणि एकात्मतेचा संदेश देणारा दिशादर्शक उपक्रम ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे