आपला जिल्हा

विद्यार्थ्यांच्या यशस्वी लढ्याचे संगमनेरात स्वागत; काँग्रेससह समविचारी पक्षांचा आनंदोत्सव

विद्यार्थ्यांच्या यशस्वी लढ्याचे संगमनेरात स्वागत; काँग्रेससह समविचारी पक्षांचा आनंदोत्सव

विद्यार्थ्यांच्या यशस्वी लढ्याचे संगमनेरात स्वागत; काँग्रेससह समविचारी पक्षांचा आनंदोत्सव

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २५ जुलै २०२६-: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर संगमनेरमध्ये काँग्रेससह विविध समविचारी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला. केंद्र सरकारला तरुणाईने झुकवले असून गर्विष्ठ सत्तेला जाब विचारण्यासाठी देशातील युवक आता सज्ज झाले आहेत, असे प्रतिपादन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले.
संगमनेर बसस्थानक परिसरात युवक काँग्रेस, छात्र भारती, शिवसेना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक समाज, दलित पँथर, शेतकरी संघटना, एनएसयूआय, महिला संघटना तसेच विविध पुरोगामी व विद्यार्थी संघटनांच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, मागील २८ दिवसांपासून जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. मात्र केंद्र सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत ते दडपण्याचा प्रयत्न केला. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यात अनेक युवक-युवती जखमी झाले. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता. अखेर तरुणांच्या एकजुटीपुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. मात्र विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न अद्यापही प्रलंबित असून त्यासाठी लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्यासाठी तरुणांनी संघटित होऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

जाहिरात

यावेळी दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आंदोलन करणारे विद्यार्थी कोणत्याही पक्षाचे नव्हते, ते देशाचे भवितव्य होते. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्यावर अमानुषपणे लाठीहल्ला केला. अनेक विद्यार्थिनींनाही त्रास सहन करावा लागला. भर पावसात रस्त्यावर झोपून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले. त्यांच्या संघर्षामुळे सरकारला माघार घ्यावी लागली असून देशासाठी तरुणांनी अशीच एकजूट कायम ठेवावी.
शिवसेनेचे अमर कतारी, ॲड. रंजना गवांदे, तुषार पानसरे आणि शेखर सोसे यांनीही यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. कार्यक्रमास विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘झेन जी’चा जल्लोष
आंदोलनाला यश मिळाल्यानंतर संगमनेरमध्ये युवकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी “झेन जी जिंदाबाद” अशा घोषणा देत लोकशाही, राज्यघटना आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी यापुढेही एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे