अभिजित दिपके यांनी कोणाच्या दबावाला बळी न पडता धमकी देणाऱ्यांची नावे जाहीर करा : ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अभिजित दिपके यांनी कोणाच्या दबावाला बळी न पडता धमकी देणाऱ्यांची नावे जाहीर करा : ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अभिजित दिपके यांनी कोणाच्या दबावाला बळी न पडता धमकी देणाऱ्यांची नावे जाहीर करा : ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

Shirdi vijay kapse दि ३१ जुलै २०२६–अभिजित दिपके यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून वक्तव्ये करू नयेत. त्यांना धमकी अथवा कोणतीही ऑफर देण्यात आली असेल, तर त्याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टपणे मांडावी. केवळ भारतीय जनता पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची विधाने करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारची भूमिका सुरुवातीपासून सकारात्मक होती. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, जनाधार गमावलेल्या काही राजकीय पक्षांनी या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न केल्याची टीका त्यांनी केली.
अभिजित दिपके यांनी संदिग्ध वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांना नेमकी धमकी कोणी दिली, कोणाकडून ऑफर देण्यात आली, याची माहिती स्पष्टपणे जाहीर करावी. त्यांच्या माध्यमातून कोणाचा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला त्यांनी बळी पडू नये, असा सल्लाही मंत्री विखे पाटील यांनी दिला.

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केंद्रीय प्रवेश परीक्षांसह इतर परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. परीक्षा सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले असून त्याचे देशभर स्वागत झाले आहे. तसेच परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्कफोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, लोकसभेचे सभागृह हे बेताल वक्तव्यांसाठी नसून त्याची गरिमा कायम राखली गेली पाहिजे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात खासदार अनुरागसिंह ठाकूर यांनी मांडलेल्या ठरावाला त्यांनी समर्थन असल्याचेही स्पष्ट केले.




