वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानचा मदतीचा हात; आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेवकांचे तत्पर मदतकार्य

वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानचा मदतीचा हात; आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेवकांचे तत्पर मदतकार्य
वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानचा मदतीचा हात; आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेवकांचे तत्पर मदतकार्य

Kopargaon vijay kapse दि ३१ जुलै २०२६–सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नगर–मनमाड महामार्गावरील येवला–कोपरगाव मार्गावर आंचलगाव पाटीजवळ कंटेनर, ट्रक आणि पिकअप वाहनाचा भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक प्रवासी, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांतील वाहने तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडली. संततधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असताना आंचलगाव ते कोपरगाव परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.

घटनेची माहिती मिळताच आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, चहा, बिस्किटे तसेच नाश्त्याचे वाटप करण्यात आले. दीर्घकाळ वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांची विचारपूस करून त्यांना आवश्यक ती मदतही करण्यात आली.
यावेळी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगाव व येवला पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून वाहतूक सुरळीत करण्याबाबत चर्चा केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत नगर–मनमाड महामार्गावरील उर्वरित दुपदरी मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधत वाहनांना योग्य दिशेने मार्गस्थ करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मुसळधार पावसातही सेवाभावाने कार्य करणाऱ्या युवा सेवकांच्या तत्परतेचे नागरिकांनी मनापासून कौतुक केले.
संकटाच्या काळात समाजाच्या मदतीसाठी धावून जाणे, गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि मानवतेची सेवा करणे हीच संजीवनी युवा प्रतिष्ठानची ओळख असल्याचे या मदतकार्याने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या शेकडो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.




