आपला जिल्हा

अमृतवाहिनी इंजि. कॉलेजच्या इनोव्हेशन सेंटरचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी करार

अमृतवाहिनी इंजि. कॉलेजच्या इनोव्हेशन सेंटरचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी करार

कृषी क्षेत्रातील ‘स्टार्टअप्स’ना मिळणार मोठं बळ

Sangmner vijay kapse दि ३१ जुलै २०२६अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर येथील अमृतवाहिनी इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यात संशोधन, नवोपक्रम व उद्योजकतेला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर यांनी दिली.

जाहिरात

या सामंजस्य कराराचा मुख्य भर कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्त संशोधन तसेच इंटरनेट ऑफ थिंग्ज, कृषी रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांचा कृषी क्षेत्रातील प्रभावी वापर यावर असून विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे स्मार्ट आणि शाश्वत शेतीला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. या सहकार्यामुळे कृषी क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळून नाविन्यपूर्ण कल्पनांचे उद्योजकतेमध्ये रूपांतर करण्यास मोठी मदत होईल.

जाहिरात

“आजचे तरुण विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, शेती आणि शेतकऱ्यांच्या वास्तववादी समस्यांवर ‘एआय’ सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दाखवलेली कल्पकता आणि राहुरी कृषी विद्यापीठासोबत झालेला करार हा कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरेल. अशा नवसंशोधकांच्या पाठीशी अमृतवाहिनी संस्था सदैव भक्कमपणे उभी राहील.” मा. बाळासाहेब थोरात (अध्यक्ष, अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था) अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शाखेच्या अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या एका ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ प्रकल्पाने कृषी तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली आहे. शंतनू गमे, आयुष गायकवाड, सिद्धेश गीते आणि संयम गोडसे या तरुण संशोधकांच्या प्रकल्पामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान विश्लेषण आणि सॅटेलाईट मॉनिटरिंगचा वापर करून उसाच्या रोगांचे वेळेत निदान करणारी ही प्रणाली त्यांनी तयार केली. विद्यार्थ्यांच्या याच कल्पकतेमुळे आणि पुढाकारामुळे अमृतवाहिनी आणि महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात महत्त्वपूर्ण करार शक्य झाला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.

जाहिरात

हा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. व्ही. के. खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे संपन्न झाला. या प्रसंगी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘अमृतवाहिनी इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर’चे प्रमुख डॉ. डी. एस. बजाज आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक (संशोधन) डॉ. पी. एस. बोडके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी डॉ. व्ही. एस. आहेर, समन्वयक, पीएच.डी. संशोधन केंद्र, अमृतवाहिनी, डॉ. एम. बी. गुंजाळ, संगणक अभियांत्रिकी विभाग तसेच डॉ. एस. ए. कदम, कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हे मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

संस्थेचे अध्यक्ष व माजी महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात, विश्वस्त मा. डॉ. सुधीर तांबे आणि विश्वस्त  शरयु देशमुख यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली महाविद्यालय नवनवीन उपक्रम राबवत असून, विद्यार्थ्यांतील संशोधन वृत्तीला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. या विद्यार्थी-केंद्रित प्रयत्रांबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, संस्थेचे संचालक शैक्षणिक डॉ. जे. बी. गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. बाविस्कर, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, सर्व विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे