आपला जिल्हा

एसएमबीटीच्या पुढाकारातून मालदाड मच्छिंद्रनाथ गडावर ११,५०० वृक्षांचे रोपण; १२५ भावी डॉक्टरांचे श्रमदान

एसएमबीटीच्या पुढाकारातून मालदाड मच्छिंद्रनाथ गडावर ११,५०० वृक्षांचे रोपण; १२५ भावी डॉक्टरांचे श्रमदान

एसएमबीटीच्या पुढाकारातून मालदाड मच्छिंद्रनाथ गडावर ११,५०० वृक्षांचे रोपण; १२५ भावी डॉक्टरांचे श्रमदान

Sangmner vijay kapse दि ५ ऑगस्ट २०२६: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गडावर तब्बल ११ हजार ५०० देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमात १२५ भावी डॉक्टर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ग्रामस्थांसमवेत श्रमदान करून दंडकारण्य अभियानाला बळ दिले.

जाहिरात

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत हा उपक्रम पार पडला. यावेळी अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट आणि ग्रामस्थांचे कौतुक केले.
यावेळी प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, सरपंच गोरख नवले, समन्वयक प्रा. दशरथ वर्पे, डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीश अब्राहम, प्रशासकीय अधिकारी डॉ. सुयोग तूपसाखरे, कार्यालयीन अधीक्षक रमेश दिघे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ, महिला, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

मच्छिंद्रनाथ गडावर यापूर्वी सीसीटी (कॉन्टूर ट्रेंच) काम करण्यात आले असून त्यामध्ये कडुलिंब, वड, पिंपळ, चिंच, आवळा, हिरडा, करंज, सीताफळ, करवंद आणि बांबू यांसह विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांचे संवर्धन ग्रामस्थांच्या सहभागातून केले जाणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले, “निरोगी सृष्टीसाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनी अनुभवले. त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
दुर्गाताई तांबे यांनी मच्छिंद्रनाथ गड भविष्यात पर्यावरण, अध्यात्म आणि पर्यटनाचे आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तर डॉ. जयश्री थोरात यांनी भावी डॉक्टरांनी केलेले श्रमदान इतर युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

जाहिरात

समन्वयक दशरथ वर्पे यांनी दंडकारण्य अभियानांतर्गत विविध डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धनाची माहिती दिली. सरपंच गोरख नवले यांनी ग्रामस्थ, महिला व युवकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दशरथ वर्पे यांनी केले, तर आभार सरपंच गोरख नवले यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे