आपला जिल्हा

आ. काळे यांच्या गलिच्छ राजकारणाकडे नागरिकांनी फिरवली पाठ : राजेंद्र सोनवणे

आ. काळे यांच्या गलिच्छ राजकारणाकडे नागरिकांनी फिरवली पाठ : राजेंद्र सोनवणे
आ.आशुतोष काळे यांच्या आंदोलनाचा फुगा फुटला : सोनवणे
काळेंच्या आंदोलनाकडे कोपरगावकरांनी फिरवली पाठ : राजेंद्र सोनवणे
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १९ ऑगस्ट २०२६कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे त्यावर कोपरगाव नगरपरिषद आणि गोप्रेमी मोकाट जनावरांना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जवळपास एकाच दिवसात 33 जनावरे पकडण्यात यश मिळाले आहे. काळे गटाने नगरपरिषदेच्या विरोधात मोर्चा काढला मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद नागरिकांचा मिळाल्याने त्यांच्या या गलिच्छ राजकारणाला नागरिकांनी झुगारले आहे अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिली आहे.

जाहिरात
काही दिवसांपूर्वी अपघातात दोन नागरिकांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली देणाऱ्या फलकाचे देखील राजकारण आशुतोष काळे यांच्याकडून झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला. प्रशासन काळात काळे यांच्याकडे सर्वाधिकार असताना मोकाट जनावरांचा बंदोबस्त त्यांना करता आला नाही वारंवार विविध संघटनांनी मागणी केली होती तरीही त्यावर कारवाई न करता मृत जनावरांच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले त्या काळात निघाली व भ्रष्टाचार झाल्याचे आरोप देखील यापूर्वी झालेले आहेत.

जाहिरात
बाहेरील गोशाळा पकडलेली जनावरे स्वीकारण्यासाठी तयार नाही कारण त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही.त्यामुळे नगरपरिषद गोप्रेमींच्या मदतीने गोशाळा निर्माण करत आहे. काळे यांनी जनआक्रोश असे भासवत नागरिकांना मोर्चात येण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पण त्यांचा हेतू शुद्ध नसल्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
मोकाट जनावरे हा प्रश्न केवळ कोपरगाव पुरता मर्यादित नाही तर तो अनेक शहर आणि तालुक्यांमध्ये आहे. या जनावरांना नागरिक चारा आणि खाद्यपदार्थ रस्त्यावर टाकतात त्यामुळे ती जनावरे त्या भागामध्ये वावरतात. कोपरगाव नगरपरिषदेने यावर सकारात्मक पाऊल टाकत पकडलेली जनावरे बाजारभावाच्या ५०% पावती फाडल्यानंतरच मालकाला परत मिळतील अन्यथा ती जनावरे कार्यवाहीप्रमाणे जमा झालेली असतील अशी भूमिका नगराध्यक्ष पराग संधान यांनी यापूर्वीच मांडली होती.मुळात कुणाच्याही मृत्यूचे भांडवल करून अशा स्वरूपाचे राजकारण करणे हे काळे गटाला शोभा देणारे नाही अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली आहे.

जाहिरात
 हेतू प्रामाणिक नसल्याने नागरिकांनी काळे गटाच्या दर्जाहीन राजकारणाला नाकारून मोर्चाकडे पाठ फिरवल्याने उद्विग्न झाले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे