रस्ते, घाट, रेल्वे स्टेशनच्या विकासाबरोबरच फळबाग संस्थांचा कर्जमाफीत समावेशाची आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रस्ते, घाट, रेल्वे स्टेशनच्या विकासाबरोबरच फळबाग संस्थांचा कर्जमाफीत समावेशाची आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
रस्ते, घाट, रेल्वे स्टेशनच्या विकासाबरोबरच फळबाग संस्थांचा कर्जमाफीत समावेशाची आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kopargaon vijay kapse दि २२ ऑगस्ट २०२६– नाशिक कुंभमेळ्याच्या काळात पौराणिक महत्व असलेल्या कोपरगावात ठिकठिकाणच्या तिर्थक्षेत्री साधू आणि भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे रस्ते आणि नदीकाठच्या घाटांच्या विकासासाठी निधी मिळावा. रेल्वे स्थानकावर विशेष सुविधा निर्माण कराव्यात आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत सहकारी फळबाग योजनांचा समावेश करावा. अशा तीन महत्वाच्या मागण्या आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केल्या.

या भेटीत त्यांनी या तिनही मागण्यांबाबत फडणवीस यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली. याबाबत माहिती देताना आमदार आशुतोष काळे म्हणाले, कुंभमेळ्याच्या काळात देशभरातील साधू आणि भाविक पुजा पाठ आणि गोदावरीच्या स्नानासाठी कोपरगावात येतात. हि परंपरा प्राचीन आहे. या काळात तिर्थक्षेत्री जाणारे महत्वाचे रस्ते आणि गोदाकाठचे महत्वाचे घाट विकसित करणे गरजेचे आहे. तेथे भाविक आणि साधु संतांसाठी सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी रांजणगाव देशमुख ते झगडे फाटा, पढेगाव ते उक्कडगाव रस्ता आणि कोळगाव पाटी ते देर्डे फाटा हे महत्वाचे रस्ते सुधारण्यासाठी निधी मिळणे आवश्यक आहे.

कोपरगाव बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते, स्वच्छतागृह, विश्रामगृह, सुसज्ज प्रतीक्षालय आणि इतर प्रवाशी सुविधा करणे अत्यंत गरजेचे आहे. गोदावरी नदीवर चासनळी, मोर्वीस आणि कोकमठाण येथे घाट बांधण्यासाठी तसेच कुंभारी, कोपरगाव बेट आणि संवत्सर घाट विकसित करण्यासाठी निधी मिळावा. घाट परिसराला जोडणारे रस्ते, विद्युत रोषणाई आणि परिसर सुशोभीकरण करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आपण या भेटीत केली. त्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनुकूल प्रतिसाद दिला.
कोपरगाव मतदार संघातील काही फळबाग उत्पादक सहकारी संस्थांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही. या संस्था जिल्हा सहकारी बँकेच्या सभासद संस्था आहेत. नियमित कर्जफेड करतात. मात्र त्यांचा समावेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेत करण्यात आलेला नाही. त्यामुळे या संस्थेच्या कर्जमाफी योजनेत पात्र असलेल्या शेतक-यांना लाभ मिळालेला नाही. या संस्थांचा कर्जमाफी योजनेत समावेश करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनी त्यास अनुकूलता दाखवीली.-आमदार आशुतोष काळे



