स्वातंत्र्य दिनानिमित्त गोदावरी बायोरीफायनरीज कडून हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनानिमित्त गोदावरी बायोरीफायनरीज कडून हार्दिक शुभेच्छा
स्वातंत्र्य दिनानिमित्त गोदावरी बायोरीफायनरीज कडून हार्दिक शुभेच्छा
Kopargaon vijay kapse दि १५ ऑगस्ट २०२६: भारतीय स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट निमित्त गोदावरी बायोरीफायनरीज लि. यांच्या वतीने देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य, एकता, प्रगती आणि राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांना अभिवादन करत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.
सोमैय्या ग्रुपचा भाग असलेली गोदावरी बायोरीफायनरीज ही जैव-शुद्धीकरण क्षेत्रातील कंपनी असून साखर, रसायने आणि मेण निर्मितीबरोबरच विविध औद्योगिक, फार्मा व विशेष रसायनांचे उत्पादन करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये इंडस्ट्रियल ग्रेड शुगर, फार्मा ग्रेड शुगर, रेक्टिफाइड स्पिरिट, परफ्युमरी ग्रेड अल्कोहोल, इथाइल अॅसिटेट, बायो ब्यूटॅनॉल, नॅट्रोवॅक्स, सिनॅमल्डिहाइड आदींचा समावेश आहे.
पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रिया, शाश्वत विकास आणि गुणवत्तेला प्राधान्य देत “Cleaner Chemistry, Greener Tomorrow – Sustainable by Nature – Quality We Trust” या संकल्पनेतून कंपनीचा उद्योगविश्वातील प्रवास सुरू आहे. गोदावरी बायोरेफायनरीजचे नोंदणीकृत कार्यालय सोमैया भवन, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई येथे असून कंपनीचे कारखाने साकरवाडी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर तसेच समीरवाडी, जि. बागलकोट, कर्नाटक येथे आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाच्या प्रगतीत उद्योगक्षेत्राचे योगदान वाढावे आणि शाश्वत विकासातून समृद्ध भारत घडावा, अशी भावना कंपनीच्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त करण्यात आली आहे.