आपला जिल्हा

नाथाभाऊंचा अमृत महोत्सव म्हणजे संघर्ष, कर्तृत्व आणि जनसेवेचा गौरव :शरद पवारांच्या उपस्थितीत सत्कार

नाथाभाऊंचा अमृत महोत्सव म्हणजे संघर्ष, कर्तृत्व आणि जनसेवेचा गौरव :शरद पवारांच्या उपस्थितीत सत्कार

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना आनंदी, निरोगी व दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

Vijay kapse दि ३० ऑगस्ट २०२६ज्येष्ठ नेते तथा माझे परममित्र मा. एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून त्यांचा सत्कार करण्याचा आणि त्यांना आनंदी, निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्याचा विशेष आनंद झाला. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक आमदार, खासदार व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

जाहिरात

नाथाभाऊ आज वयाच्या ७५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा केवळ वाढदिवसाचा सोहळा नसून, त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील संघर्ष, कर्तृत्व, धडपड आणि जनसेवेचा गौरव करणारा अविस्मरणीय सोहळा आहे.

सरपंच पदापासून सुरू झालेली नाथाभाऊंची राजकीय वाटचाल आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते अशा विविध टप्प्यांतून पुढे गेली. या प्रवासात त्यांनी अनेक चढ-उतार आणि आव्हाने पाहिली; मात्र संघर्षाची साथ कधीही सोडली नाही. जनसामान्यांशी असलेली नाळ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.

जाहिरात

माझी आणि नाथाभाऊंची मैत्रीही अनेक दशकांची आहे. सन १९८५ मध्ये मी आमदार झालो, तर १९९० मध्ये नाथाभाऊ आमदार झाले. त्याच काळात आमची भेट झाली. त्यावेळी पुष्पाताई हिरे मंत्री होत्या. मतदारसंघातील विविध प्रश्नांवर सकाळी फोन करण्यासाठी आम्ही एकत्र बसायचो. याच माध्यमातून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि आजपर्यंत ही मैत्री तितक्याच जिव्हाळ्याने व विश्वासाने टिकून आहे.

नाथाभाऊंची आमदारकी, मंत्रीपद आणि विरोधी पक्षनेतेपद मी जवळून पाहिले आहे. विशेषतः १९९५ ते १९९९ या काळात ते जलसंपदा मंत्री असताना कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. जलसंपदा विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय त्यांनी प्रभावीपणे हाताळले. तापी खोरे विकासाला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचावे, यासाठी त्यांचा सातत्याने आग्रह राहिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि त्यांच्या हक्कासाठी आग्रही असलेला नेता म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

जाहिरात

नाथाभाऊ विरोधी पक्षनेते असतानाचा काळही महत्त्वाचा होता. विरोधी पक्षनेत्याची भूमिका प्रभावीपणे कशी पार पाडावी, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. विविध विषयांचा सखोल अभ्यास करून सभागृहात तासन्‌तास अभ्यासपूर्ण भाषणे करण्याची त्यांची क्षमता संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली आहे.

सरपंचापासून आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असा प्रदीर्घ प्रवास करूनही जनसामान्यांशी असलेले त्यांचे नाते कायम राहिले. त्यामुळे नाथाभाऊ हे केवळ राजकारणी नाहीत, तर जनमानसात पोहोचलेले आणि जनमाणसातले नेते आहेत.

जाहिरात

नाथाभाऊंचा अमृत महोत्सव देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते साजरा होत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील संघर्ष आणि कर्तृत्वाचा गौरव होताना मनापासून आनंद होत आहे.

नाथाभाऊंना पुढील आयुष्य आनंदी, निरोगी, यशस्वी आणि समाधानाचे लाभावे. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांच्या हातून समाजाची व जनतेची अशीच अविरत सेवा घडत राहावी, हीच परमेश्वराच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे