आपला जिल्हा

सीमेवरील सैनिकांसाठी एकविरा फाउंडेशनकडून २१०० तिरंगा राख्या

सीमेवरील सैनिकांसाठी एकविरा फाउंडेशनकडून २१०० तिरंगा राख्या

  1. बचत गटातील महिला व विद्यार्थिनींचा उपक्रम; मागील १२ वर्षांपासून राख्या पाठविण्याची परंपरा
जाहिरात

Sangmner vijay kapse दि १ सप्टेंबर २०२६: ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून २१०० तिरंगा राख्या सैनिकांना पाठविण्यात आल्या.

जाहिरात

लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील बारा वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.

आदिशक्ती महिला स्वयंसहाय्यता समूह (उंबरी), मैत्री महिला स्वयंसहाय्यता समूह (वडगाव पान), देवगिरी महिला बचत गट व ओम साई महिला बचत गट (पिंपळगाव कोंझिरा), संग्राम मूकबधिर विद्यालय (वेल्हाळे) यांसह विविध बचत गटांतील महिला व विद्यार्थिनींनी या राख्या तयार केल्या आहेत.

जाहिरात

यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, “देशाच्या रक्षणासाठी घरापासून हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सैनिक बंधूंसाठी पाठविलेल्या या राख्या हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.”

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे