आज खांडगाव येथे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची उपस्थितीत भव्य ऊस विकास मेळावा

Sangmner vijay kapse दि २ सप्टेंबर २०२६– : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी मा. कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता खांडगाव येथील बेणेमळा येथे भव्य ऊस विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली.

ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादन देणारे पीक असून, एकरी उत्पादन वाढविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, हा मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे.

मेळाव्यास महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, ॲड. माधवराव कानवडे, दुर्गा तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावे