आपला जिल्हा

गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्याच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील-आ.आशुतोष काळे

गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्याच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील-आ.आशुतोष काळे

गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्याच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील-आ.आशुतोष काळे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ५ सप्टेंबर २०२६- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध विकासकामांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिली आहे. या निधीतून कित्येक विकासकामे पूर्ण झाली असून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत.त्यामुळे पूर्व भागाच्या रखडलेल्या विकासाला मागील सात वर्षात चालना मिळाली. विकासकामांच्या अडचणींची मला जाणीव असून त्या अडचणी दूर करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. महत्वाच्या असणाऱ्या काही रस्ते व पुलांचा प्रश्न मार्गी लागला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढायचा आहे. त्यासाठी गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्याच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

जाहिरात

तालुक्याच्या पूर्व भागातील वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील तिळवणी,आपेगावगोधेगाव,शिरसगाव, सावळगाव,उक्कडगाव, कासली, पढेगाव आदी गावातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी व विविध कामांचे भूमिपूजनलोकार्पण व पाहणी तसेच तिळवणी येथील पूर्व भागातील पालखेड डाव्या कालव्यातून भरण्यात आलेल्या पाझर तलावांच्या पाण्याचे जलपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांच्या विकासाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. सात वर्षात रस्त्यांच्या विकासाबरोबरच महत्वाच्या पुलांच्या निर्मितीसाठी निधी दिला आहे. या निधीतून शिरसगाव-तिळवणी,कोळ नदीवरील पुलामुळे दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे.

जाहिरात

पूर्व भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या पाण्याची मोठी अडचण असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ओव्हरफ्लोच्या काळात गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्यास परवानगी द्यावी या मागणीला जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जलसंपदा विभागाकडून सर्व्हेक्षण करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गोदावरी डाव्या कालव्यातून उपसा सिंचनद्वारे पाणी उचलण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल याचा अहवाल सबंधित अधिकाऱ्यांकडून जलसंपदा विभागाला अहवाल सादर झाल्यानंतर पाणी उचलण्यासाठी लवकरात लवकर परवानगी कशी मिळविता येईल यासाठी अविरतपणे पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

जाहिरात

यावेळी त्यांनी तिळवणी येथील जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीची व २५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी करून काम दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच तिळवणी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. १० लाख रुपयांच्या शिरसगाव,गोधेगाव रस्ता ते शेख वस्ती खडीकरण कामाचे भूमिपूजन व आपेगाव येथे ७ लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या बंदिस्त जिमचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन व संलग्न संस्थांचे पदाधिकारीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्यसार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणचे अधिकारीकृषी सहाय्यकसरपंच,उपसरपंच,सदस्य,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी आदींसह शिरसगाव,सावळगाव,कासली,गोधेगावतीळवणी,आपेगाव व उक्कडगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे