आपला जिल्हा

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्णय; दहीहंडीचा जल्लोष टाळून आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्णय; दहीहंडीचा जल्लोष टाळून आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात
यंदाची मानाची दहीहंडी साध्या स्वरूपात,भव्य आयोजनाचा खर्च पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत जमा करणार
Kopargaon vijay kapse दि ५ सप्टेंबर २०२६
कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी यंदा साध्या व प्रातिनिधिक स्वरूपात साजरी करण्यात येणार असून, भव्य आयोजनाचा खर्च टाळून वाचणारी रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत जमा करण्याचा निर्णय संजीवनी युवा प्रतिष्ठानने घेतला आहे. देशातील विविध भागांत नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक संकटात सापडले असताना उत्सवाच्या खर्चाऐवजी आपत्तीग्रस्तांच्या मदतीला हातभार लावण्याचा हा निर्णय घेतला असल्याची माहिती संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

जाहिरात
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक बांधिलकीचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते मानाची दहीहंडी फोडण्यात येणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी केले आहे.

जाहिरात
देशातील विविध भागांत निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडी उत्सवाला सामाजिक मदतीची जोड देण्यात आली आहे. २६ ऑगस्ट २०२६ रोजी नेपाळमध्ये निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असून, संकटग्रस्त नागरिकांना मदत मिळावी यासाठी दहीहंडीच्या भव्य आयोजनावरील खर्चातून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.‘उत्सवापेक्षा माणुसकी मोठी’ या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सव साजरा करताना समाजाप्रती असलेले दायित्वही जपले पाहिजे, या विचारातून दहीहंडीचा कार्यक्रम साध्या स्वरूपात घेण्यात येणार आहे. उत्सवाच्या माध्यमातून आनंद साजरा करण्याबरोबरच संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठानने यापूर्वीही नैसर्गिक आपत्ती आणि संकटाच्या काळात समाजहिताला प्राधान्य दिले आहे. २०१९ मध्ये कोल्हापूर-सांगली येथे आलेल्या महापुराच्या वेळी दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करून बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली होती. त्यामुळे यंदाचा निर्णय हा प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीची परंपरा पुढे नेणारा ठरला आहे.

जाहिरात
२०२१ मध्ये कोरोनाच्या संकटाच्या काळात प्रातिनिधिक स्वरूपात दहीहंडी साजरी करण्यात आली होती. याच काळात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५०० बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारण्यात आले होते. या केंद्रातून हजारो रुग्णांना सेवा देण्यात आली. तसेच २०२३ मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मोठ्या स्वरूपातील दहीहंडी रद्द करून पर्जन्य यागाचे आयोजन करण्यात आले होते.यंदाही उत्सवाचा अनावश्यक खर्च टाळून तो आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी उपयोगात आणण्याचा निर्णय घेत संजीवनी युवा प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकीची आपली परंपरा कायम ठेवली आहे अशी भूमिका संजीवनी युवा प्रतिष्ठान कडून मांडण्यात आली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे