आपला जिल्हा

सोमैया महाविद्यालयात केंद्र शासन पुरस्कृत ‘स्टार कॉलेज प्रोग्राम समन्वयक व ७ वी आढावा बैठक’

सोमैया महाविद्यालयात केंद्र शासन पुरस्कृत ‘स्टार कॉलेज प्रोग्राम समन्वयक व ७ वी आढावा बैठक’

सोमैया महाविद्यालयात केंद्र शासन पुरस्कृत ‘स्टार कॉलेज प्रोग्राम समन्वयक व ७ वी आढावा बैठक’

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ११ सप्टेंबर २०२६-  के. जे. सोमैया महाविद्यालयात केंद्र सरकारच्या डीबीटी स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत ‘डीबीटी स्टार कॉलेज सहाय्य प्राप्त महाविद्यालयांच्या टास्क फोर्सची समन्वयक बैठक व सातवी आढावा बैठक’ येत्या 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील बैठकीची यजमानपदाची संधी महाविद्यालयाला मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.

जाहिरात

यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त मा. संदीप रोहमारे आणि बैठकीचे संयोजक डॉ. शंकरैया कोंडा उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, डीबीटी स्टार कॉलेज प्रोग्राम हा केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असून, उच्च गुणवत्तेच्या महाविद्यालयांमध्ये विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी या माध्यमातून भरीव आर्थिक सहाय्य दिले जाते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर बैठका आयोजित केल्या जातात. यावर्षीच्या तीन दिवसीय बैठकीसाठी के. जे. सोमैया महाविद्यालयाची यजमान संस्था म्हणून निवड झाली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

जाहिरात

ही समन्वयक बैठक हायब्रीड स्वरूपात होणार असून देशभरातून सुमारे 350 प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे सुमारे 20 टास्क फोर्स सदस्य व प्रतिनिधी तसेच स्टार कॉलेजमधील सुमारे 80 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. विविध संशोधन प्रकल्पांची प्रगती व निष्पत्ती दर्शविणारे पोस्टर्स यावेळी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

बैठकीदरम्यान विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, मार्गदर्शन सत्रे तसेच संशोधनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे. सहाय्य प्राप्त महाविद्यालयांचा संशोधन प्रवास, त्यांना मिळालेले यश, कार्यपद्धती, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि त्यांचा झालेला व्यापक परिणाम यावरही प्रकाश टाकण्यात येणार आहे. देशभरातून सुमारे 250 प्राध्यापक समन्वयक व इतर संबंधित घटक या बैठकीत सहभागी होणार असल्याचे डॉ. ठाणगे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त मा. संदीप रोहमारे म्हणाले की, “स्टार कॉलेज प्रोग्राम अंतर्गत सहाय्य प्राप्त महाविद्यालयांच्या टास्क फोर्सची ही समन्वयक बैठक आम्ही यशस्वीपणे पार पाडू. ज्ञानाचे आदान-प्रदान, सर्वोत्तम कार्यपद्धतींचा प्रचार-प्रसार आणि डीबीटी स्टार कॉलेज प्रोग्रामची उद्दिष्टे अधिक बळकट करण्यासाठी ही बैठक उत्कृष्ट व्यासपीठ ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे