आपला जिल्हा

गणेश उत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेश उत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
गणेश उत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
जाहिरात

Sangmner vijay kapse दि ११ सप्टेंबर २०२६काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळामध्ये कारखाना कार्यस्थळावर 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या काळात विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपाध्यक्ष कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली आहे.

जाहिरात

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये कारखाना कार्यस्थळावर विविध दर्जेदार कार्यक्रम होत असतात. यावर्षी सोमवार दिनांक 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी नऊ वाजता श्री गणेशाची स्थापना होणार आहे. याचबरोबर बुधवारी 16 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते संतोष पवार, विनय येडेकर, आनंदा कारेकर,सानिका शिंदे,सोनाली मगर,आदित्य गटे,संकेत बीवलकर यांच्या उपस्थितीत ए भाऊ डोकं नको खाऊ हे विनोदी नाटक होणार आहे. तर गुरुवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत रांगोळी व मेहंदी स्पर्धा. शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8.30 वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटक व सिने अभिनेते संजय नार्वेकर विजय पटवर्धन यांच्या उपस्थितीत भ्रमाचा भोपळा हे होणार आहे. सोमवार 21 सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापूजा व रात्री अमृतेश्वर भजनी मंडळाचे भजन होणार आहे. मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता ऑर्केस्ट्रा रंगतरंग हा होणार आहे तर बुधवारी 23 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता संगीत खुर्ची व चमचा लिंबू होणार आहे. गुरुवारी 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता राहणे प्रस्तुत खेळ पैठणीचा हा लय भारी संगमनेरी हा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी साडेनऊ वाजता श्रींची मिरवणूक व विसर्जन होणार आहे.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात,कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत.

तरी या गणेश मंडळाच्या सर्व कार्यक्रमांसाठी अमृतनगर,घुलेवाडी,मालदाड,वेल्हाळे, गुंजाळवाडी, सुकेवाडी,संगमनेर व परिसरातील सर्व नागरिक महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपाध्यक्ष जगन्नाथ घुगरकर, कार्याध्यक्ष रामदास तांबडे,खजिनदार भारत देशमुख,सेक्रेटरी संदीप दिघे,कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे,संचालक कृष्णा दिघे, अनिल पाटोळे, बबन सावंत,संजय मांडे,शिवाजी वाणी,विनायक जोंधळे, अजित मोकळ, राजू बड आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे