के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Kopargaon vijay kapse दि ११ सप्टेंबर २०२६– कोपरगाव तालुका आरोग्य विभाग आणि के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालय यांच्या सहकार्याने महाविद्यालयात नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयातील १२१५ विद्यार्थ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षी सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यातून गरजू आणि आरोग्याच्या समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जाते.
या आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार गायकवाड, डॉ. अक्षय सालपुरे, डॉ. काजल गलांडे, डॉ. मनीषा बेंद्रे हे उपस्थित होते. तसेच सचिन फोफसे, किरणकुमार पर्वत हे औषधनिर्माण अधिकारी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले तसेच शारीरिक व मानसिक आरोग्याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आजारी व गरजवंत विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक योग्य तो लाभ मिळवून देण्याच्या नोंदी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे हे उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



