आपला जिल्हा

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये चालक दिन; ५० बसचालकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये चालक दिन; ५० बसचालकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान

बसचालक म्हणजे पालकांनी ठेवलेल्या विश्वासाची जबाबदारी : प्रकाश गवळी

Kopargaon vijay kapse दि २० सप्टेंबर २०२६ : “ज्याप्रमाणे आई-वडील आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतात, त्याचप्रमाणे बसचालक दररोज विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी घेतात. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत आणणे आणि सुखरूप घरी पोहोचविणे ही केवळ त्यांची नोकरी नसून, पालकांनी त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य चालक-मालक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केले.

जाहिरात

समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या संकल्पनेतून शाळेत चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ५० बसचालकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक काका कोयटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश गवळी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी कोपरगाव तालुका ट्रक ड्रायव्हर-मालक वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अय्युबभाई कच्ची, सचिव शैलेशशेठ रावल, वाहनचालक संघाचे मार्गदर्शक व सल्लागार सागर कस्तुरे, संचालक पांडुरंग राजे तसेच स्कूलच्या उपप्राचार्या मोहिनी जगताप उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांना घरातून शाळेत आणण्यापासून ते शाळा सुटल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्यापर्यंतची महत्त्वपूर्ण जबाबदारी बसचालक पार पाडतात. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची जाणीव ठेवत विद्यार्थ्यांनी चालक दिनानिमित्त त्यांचा सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि चालकांविषयीचा आदर प्रकर्षाने जाणवत होता.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात काका कोयटे म्हणाले, “आम्ही वाहनचालकांकडे केवळ कर्मचारी म्हणून पाहत नाही, तर त्यांना समता परिवारातील सदस्य मानतो. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक चालक निष्ठेने समता परिवाराची सेवा करत आहेत. काही सहकारी तर तब्बल ३० वर्षांपासून आमच्यासोबत कार्यरत आहेत. त्यांच्या हातात केवळ वाहनाचे स्टेअरिंग नसते, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि पालकांच्या विश्वासाची अमूल्य जबाबदारी असते.”

प्राचार्य समीर अत्तार यांनी वाहनचालकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करताना त्याला योग्य दिशा दिली, त्याचप्रमाणे आपल्या वाहनचालकांच्या हातात विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी आहे. ते केवळ वाहन चालवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे सारथी म्हणून कार्य करतात.”

चालक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या बसचालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासोबतच पालकांचा विश्वास जपणाऱ्या चालकांच्या कार्याचा सन्मान करण्याचा हा उपक्रम ठरला. या उपक्रमामुळे चालक आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, देखभाल व दुरुस्ती विभाग, कार्यालयीन विभाग आणि वाहतूक विभागाने विशेष परिश्रम घेतले. श्वेताली सदाफळ यांनी सूत्रसंचालन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे