आपला जिल्हा
वारीतील शिबिरात २१३ विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

वारीतील शिबिरात २१३ विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी
वारीतील शिबिरात २१३ विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

Kopargaon vijay kapse दि २ ऑक्टोबर २०२६: तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित “मोफत मदत सेवा केंद्राच्या” चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त टेके पाटील ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांच्या संकल्पनेतून इंडियन डेंटल असोसिएशन कोपरगाव शिर्डी-शाखा, यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी वारी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या २१३ विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यातील दंत तपासणी इंडियन डेंटल असोसिएशनचे तंत्र रोग तज्ज्ञ डॉ.अंकित कृष्णानी व डॉ. दिपाली चौधरी यांनी केली. तसेच मौखिक आरोग्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पहिल्या टप्प्यात रामेश्वर विद्यालयातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या १८० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी ८ सप्टेंबरला करण्यात आली होती. दोन्ही शाळा मिळून ३९३ विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करण्यात आली आहे. याप्रसंगी टेके पाटील ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके, कोपरगाव पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख लक्ष्मण पंडोरे, केंद्रप्रमुख अजित मुनतोडे, माजी ग्रा.पं.सदस्य गोरख टेके, एसएमसी सदस्य सुरज टेके, वारी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शरीफ शेख, दहिगाव बोलका शाळेचे मुख्याध्यापक चांगदेव ढेपले, सडे शाळेचे मुख्याध्यापक अमोल थिटे, जयसिंग बनगैय्या, अनिल निकम, वारी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, वारी शाळेचे शिक्षक सुधाकर आंबिलवादे, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, दत्तात्रय चव्हाण, प्रवीण आहेर, अरुण पवार, शर्मिला विधाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण अहिरे यांनी मानले.















