आपला जिल्हा

जिल्हा भाजपच्या वतीने उद्या विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचे शहरात आयोजन

जिल्हा भाजपच्या वतीने उद्या विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचे शहरात आयोजन

जिल्हा भाजपच्या वतीने उद्या विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचे शहरात आयोजन

जाहिरात

Ahilyanagar vijay kapse दि ६ ऑक्टोबर २०२६– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीस २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अहिल्यानगर जिल्हा व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचे आयोजन शहरात केले आहे. सकाळी ९ वाजता आनंदधाम समोरील केशर गुलाब मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहीती शहर जिल्हाअध्यक्ष अनिल मोहीते यांनी दिली.

जाहिरात

नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान या कारकिर्दीला यंदा २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचा अभिमान आहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना आहे. यानिमित्ताने बुधवारी विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचे केले असून सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प सभेस मार्गदर्शन करून पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरीकांशी संवाद साधणार आहेत. या संकल्प सभेस विधानपरीषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, आ.मोनिका राजळे, आ.विक्रमसिंह पाचपुते, आ.अक्षय कर्डीले, आ.प्राजक्त तनपुरे, आ.विवेक कोल्हे, जिल्हा प्रभारी माजी आमदार राम सातपुते, लक्ष्मण सावजी व भैरवी वाघ-पलांडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहाणार असल्याचे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी सांगितले.

जाहिरात

संकल्प सभेनंतर सेवा ज्योती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेस केशर गुलाब मंगल कार्यालयापासून प्रारंभ होऊन शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदीरात महाआरतीने यात्रेचा समारोप होईल. यासर्व कार्यक्रमास जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व शहर जिल्हाअध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे