आपला जिल्हा

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक संपन्न

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक संपन्न

पशुपालकांच्या समस्या जाणून घेऊन सर्वेक्षणाचे काम समन्वयाने पूर्ण करण्याचे आवाहन

Kopargaon vijay kapse दि ६ ऑक्टोबर २०२६ अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांच्या अडचणी, पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय तसेच सर्वेक्षणाच्या कामाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी (दि. ६) पंचायत समिती, कोपरगाव येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.

जाहिरात

या बैठकीस कोपरगाव  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज, कृषी अधिकारी, संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच बायफचे कृत्रिम रेतन तज्ज्ञ उपस्थित होते.

यावेळी गोदावरी दूध संघाचे चेअरमन  राजेश परजणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत दुष्काळी परिस्थितीत पशुपालकांच्या समस्या जाणून घेऊन आवश्यक माहितीचे संकलन करावे. तसेच सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन  केले.

जाहिरात

बैठकीत विविध विभागांनी परस्पर समन्वय ठेवून पशुपालकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे