आपला जिल्हा

जलसंधारणाला प्राधान्य देऊन दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रयत्न : ना. राधाकृष्ण विखे पाटील

जलसंधारणाला प्राधान्य देऊन दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रयत्न : ना. राधाकृष्ण विखे पाटील

जलसंधारणाला प्राधान्य देऊन दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रयत्न : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Vijay kapse दि ६ ऑक्टोबर २०२६–ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि भविष्यातील जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.

जाहिरात

पारनेर येथील टंचाई आढावा बैठक आटोपल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी गावातील यादवबाबा मंदिरात अण्णा हजारे यांची भेट घेतली. यापूर्वी अण्णा हजारे उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल असताना मंत्री विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. उपचारानंतर अण्णा पुन्हा राळेगणसिद्धी येथे परतल्याचे समजल्यानंतर त्यांनी ही भेट घेतली. यावेळी विनायक देशमुख, सुजित झावरे, अशोकराव सावंत आदी उपस्थित होते.

जाहिरात

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने दोघांमध्ये चर्चा झाली. शासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्री विखे पाटील यांनी अण्णा हजारे यांना दिली. यावेळी गावागावांत पाणी अडविणे, पाणी जिरविणे, नाला खोलीकरण, बंधारे उभारणे, गाळ काढणे तसेच उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन यावर सातत्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज अण्णा हजारे यांनी अधोरेखित केली.

पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाण्याऐवजी ते स्थानिक पातळीवर अडवून भूजलपातळी वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे आवश्यक आहे. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता लोकसहभागातून व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.

जाहिरात

“आजची दुष्काळी परिस्थिती ही भविष्यासाठी जलव्यवस्थापनाचे धडे देणारी आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे आणि जिरविण्यासाठी गावपातळीवर नियोजन करून जलसंधारणाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे,” असे अण्णा हजारे यांनी सांगितले.

अण्णा हजारे यांच्या या सूचनांची शासनाच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

दरम्यान, दुष्काळी परिस्थिती असतानाही राळेगणसिद्धीमध्ये पूर्वी झालेली जलसंधारणाची कामे, वृक्षलागवड आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे गावातील वनराई टिकून असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले. याच धर्तीवर दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर आणि लोकसहभाग या तीन बाबींना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक गावात कामे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे