आपला जिल्हा

आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; पश्चिम भागातील नागरिकांना मोठा दिलासा

आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश; पश्चिम भागातील नागरिकांना मोठा दिलासा

कोपरगाव-कोळपेवाडी रस्त्यासाठी केंद्राकडून १५ कोटींचा निधी मंजूर

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १३ ऑक्टोबर २०२६ : कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि वेगवान व्हावा, यासाठी रस्ते विकासाला प्राधान्य देत आ. आशुतोष काळे यांनी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून मतदारसंघातील राष्ट्रीय, राज्य व जिल्हा महामार्गांसह गाव-खेड्यातील वाड्या-वस्त्यांचे तसेच शेत-पाणंद रस्त्यांचेही विकासकामे मार्गी लावली आहेत. रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र शासन अथवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्याला यश आले असून कोपरगाव-कोळपेवाडी रस्त्याच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

जाहिरात

कोपरगाव मतदारसंघातील पश्चिम भागातील गावे कोपरगाव शहराशी जोडणारा आणि कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा धारणगाव-कुंभारी पूल माजी आमदार अशोकराव काळे यांनी बांधल्यापासून कोपरगाव-कोळपेवाडी रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढलेल्या वाहतुकीमुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

या समस्येची दखल घेऊन आ. आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे पाठपुरावा करून एमडीआर-८५ वरील धारणगाव-माहेगाव देशमुख या जवळपास पाच किलोमीटर रस्त्यासाठी ४.२० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार आहे.

जाहिरात

दरम्यान, कोपरगाव-कोळपेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्र शासनाकडून निधी मिळावा, यासाठी आ. आशुतोष काळे यांचा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती. या मागणीला ना. नितीनजी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अखेर हा पाठपुरावा फळाला आला असून कोपरगाव-कोळपेवाडी रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच राज्य शासनाचीही मंजुरी मिळणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

या निधीतून कोपरगाव-कोळपेवाडी रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील दळणवळणाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होणार आहेत. पश्चिम भागातील नागरिकांना कोपरगाव शहरात ये-जा करण्यासाठी होणाऱ्या अडचणी कमी होणार असून कुंभारी, धारणगाव, माहेगाव देशमुख, कोळपेवाडी आणि सुरेगाव आदी गावांतील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

या महत्त्वपूर्ण निधीबद्दल आ. आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी तसेच महायुती शासनाचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानले. नागरिकांच्या अडचणींची दखल घेऊन महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवून दिल्यामुळे पश्चिम भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे