आपला जिल्हा

आ. विवेक कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्याला यश

आ. विवेक कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्याला यश

शहा येथील ७ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित

सहा गावांतील १,६०३ शेतीपंप ग्राहकांना मिळणार लाभ; चार कृषी फीडरवरील वीजपुरवठा होणार अधिक सक्षम

Kopargaon vijay kapse दि १४ ऑक्टोबर २०२६ : शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अधिक सक्षम वीजपुरवठा मिळावा आणि वीजविषयक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आ. विवेक कोल्हे यांनी केलेल्या विशेष पत्रव्यवहार व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. शहा येथे २१.५० एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेला ७ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून, त्याचा थेट लाभ चास उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सहा गावांतील शेतीपंप ग्राहकांना मिळणार आहे.

जाहिरात

शहा येथील या सौर ऊर्जा प्रकल्पातून ११ केव्ही वीजवाहिनीद्वारे ३३/११ केव्ही चास उपकेंद्राला सौर वीज उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून मंजूर एजी, वडगाव एजी, बक्तरपूर एजी आणि मोरविस एजी या चार कृषी फीडरना वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे चासनळी, मोर्विस, वडगाव, बक्तरपूर, मंजूर आणि हांडेवाडी या सहा गावांतील शेतीपंप ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

जाहिरात

शेतीपंप ग्राहकांना दिवसा अधिक सक्षम वीजपुरवठा मिळावा, तसेच कृषी वीजभाराचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या दृष्टीने हा सौर ऊर्जा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पारंपरिक वीजपुरवठ्यावरील भार कमी करण्याबरोबरच उपलब्ध सौर ऊर्जेचा कृषी क्षेत्रासाठी प्रभावी वापर करण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार आहे.

जाहिरात

शेतकऱ्यांच्या वीजविषयक अडचणी सोडविण्यासाठी आ. विवेक कोल्हे यांनी संबंधित यंत्रणेकडे विशेष पत्रव्यवहार करून या प्रकल्पाच्या कार्यान्वितीबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रकल्प लवकरच कार्यान्वित होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

३,२८८ वीज ग्राहकांना मिळणार अप्रत्यक्ष लाभ

चास उपकेंद्रांतर्गत एकूण ३ हजार २८८ वीज ग्राहक आहेत. यामध्ये १ हजार ६०३ शेतीपंप ग्राहक, १ हजार ४९७ घरगुती ग्राहक, १३४ व्यापारी ग्राहक, २४ औद्योगिक ग्राहक आणि ३० इतर वीज ग्राहकांचा समावेश आहे. उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात शेतीपंप ग्राहकांची संख्या मोठी असल्याने शहा येथील ७ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कृषी वीजपुरवठ्याच्या नियोजनाला मोठे बळ मिळणार आहे.

चार कृषी फीडरवरील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याने सहा गावांतील शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंप चालविण्यासाठी अधिक चांगली वीज उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतीच्या कामांचे नियोजन अधिक सुलभ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

आ. विवेक कोल्हे यांच्या विशेष पत्रव्यवहार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आला असून, संबंधित सहा गावांतील शेतकऱ्यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आ. विवेक कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे