आपला जिल्हा

कर्मवीर शंकररावजी काळेंचे समाजकार्य म्हणजे अखंड सेवेचा यज्ञ; -ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक

कर्मवीर शंकररावजी काळेंचे समाजकार्य म्हणजे अखंड सेवेचा यज्ञ; -ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक

कर्मवीर शंकररावजी काळे यांचा १४ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ५ नोव्हेंबर २०२६ :- प्रतिकूल परिस्थितीतही समाजहिताचा ध्यास घेऊन लोककल्याणासाठी झटणारे कर्मवीर शंकररावजी काळे हे खऱ्या पुरुषार्थाचे आणि निःस्वार्थ समाजसेवेचे आदर्श होते.‘एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून त्यांनी सर्वांना सोबत घेत सहकाराच्या माध्यमातून कारखान्याची उभारणी केली. त्यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उभे राहिले आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाली. समाजाची जबाबदारी स्वत:ची जबाबदारी समजून आणि कर्मालाच पूजा मानून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे यांचे जीवन म्हणजे अखंड सेवेचा यज्ञ असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले.

सहकाराच्या मुशीतून शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करणारे, समाजोन्नतीचे स्वप्न उराशी बाळगून दूरदृष्टी आणि सेवाभावाच्या बळावर सहकार, शिक्षण, कृषी व सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा अजोड ठसा उमटविणारे, लोकसेवेच्या क्षितिजावर प्रेरणेचा तेजस्वी सूर्य बनून उभे राहिलेले कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक बोलत होते.

निमंत्रण

ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक पुढे म्हणाले की, खरे समाजसेवक आणि कर्मयोगी प्रतिकूल परिस्थितीचे गाऱ्हाणे गात बसत नाहीत, तर त्यातून मार्ग काढत समाजासाठी काय करता येईल, याचा विचार करतात.संकटांसमोर हतबल होणे हा पुरुषार्थ नसून त्यावर मात करून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आपल्या कार्यातून याच विचारांचा आदर्श घालून दिला. संत तुकाराम महाराजांच्या ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा या अभंगातील मानवतेच्या संदेशाने प्रेरित होऊन कर्मवीर शंकररावजी काळे यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखाशी आपले नाते जोडले. समाजाची कामे ही स्वतःच्या कुटुंबाचीच कामे मानून त्यांनी लोककल्याणासाठी आयुष्य समर्पित केले. कामातच परमेश्वर पाहणाऱ्या आणि कर्मालाच धर्म मानणाऱ्या कर्मवीर काळे यांचे जीवन आजही समाजाला सेवाभावाची प्रेरणा देणारे आहे, असे ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले.तसेच कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानाच्या माध्यमातून ‘तुम्हाला ज्यांनी उभे केले, त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून, त्यांच्या विषयी कृतज्ञ राहण्याचा संदेश मिळतो आणि कर्मवीर शंकररावजी काळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल कार्यकर्त्यांना अतिशय आदर आणि कृतज्ञता असल्याचे दर्शन घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे,ॲड.प्रमोद जगताप,ह.भ.प.राघ्वेश्वरानंदगिरी महाराज,ह.भ.प.सोमनाथ महाराज मोरे, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे, महानंदाचे मा.व्हा.चेअरमन राजेंद्र जाधव,बाळासाहेब कदम, विश्वासराव आहेर, ज्ञानदेव मांजरे, बाबासाहेब कोते, संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद,असी.सेक्रेटरी संदीप शिरसाठ,कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य,संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, रयत शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे वतीने उपस्थितांचे तसेच नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय मिळवून दिल्याबद्दल ज्येष्ठ, श्रेष्ठ कार्यकर्त्यांचे, व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. तसेच कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १४ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत शनिवार (दि.२१) ते सोमवार (दि.२३) दरम्यान तीन दिवस गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर भव्य ‘कर्मवीर कृषी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील नव्या संकल्पना आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असून याचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

 

 कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना केली. वारकरी संप्रदायाशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते माजी आमदार अशोकराव काळे यांनीही तितक्याच आत्मीयतेने जपले. याच संस्कारांचा वारसा आमदार आशुतोष काळे यांनी पुढे सुरु ठेवला असून त्यांच्या संकल्पनेतून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाकडून मतदार संघाच्या सहा गटातील भजनी मंडळांना वीणा, पखवाज, हार्मोनियम, दहा टाळ आणि सतरंजी हे भजन साहित्य लकी ड्रॉ पद्धतीने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शनेश्वर भजनी मंडळ वडगाव,जय हनुमान भजनी मंडळ मढी बु.,गोपाजीबाबा भजनी मंडळ बहादराबाद,दत्त प्रसाद भजनी मंडळ धोत्रे, रेणुकामाता भजनीमंडळ उक्कडगाव व हनुमान प्रसादिक भजनी मंडळ लक्ष्मीनगर कोपरगाव या भजनी मंडळांना देण्यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे