आपला जिल्हा

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करंजी येथे शेतकरी बांधवांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते करंजी येथे शेतकरी बांधवांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने उपक्रम; करंजीसह ओगदी, पढेगाव व बोलकी परिसरातील शेतकऱ्यांना लाभ

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ६ नोव्हेंबर २०२६ : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या सहकार्याने तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते अहिल्यानगर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे  करंजी गावासह ओगदी, पढेगाव आणि बोलकी परिसरातील शेतकरी बांधवांसाठी गुरुवार दि ५ नोव्हेंबर रोजी ‘आनंदाचा शिधा’ वाटप उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

निमंत्रण

या प्रसंगी खासदार वाकचौरे यांनी बोलताना सांगितले की, शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देणे हीच खरी लोकसेवा आहे. शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी, या भावनेतून आपले लोकप्रिय शेतकरी प्रिय उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने संबंध महाराष्ट्र भर हा उपक्रम राबविण्यात आला. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी खासदार वाकचौरे यांनी व्यक्त केली.

जाहिरात

या उपक्रमासाठी करंजी गावचे उपसरपंच शिवाजी जाधव, संजय उगले, सतीश भालेराव, राजेंद्र धनवटे, बाळासाहेब कोल्हे, जितेंद्र शेळके, भरत जगताप, कांतीलाल डोखे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. तर या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे