आपला जिल्हा

जोर्वे गावातील अवैध वाळू उपसा थांबवा जोर्वे ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी, तातडीने कारवाई करण्याचे निवेदन

जोर्वे गावातील अवैध वाळू उपसा थांबवा जोर्वे ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी, तातडीने कारवाई करण्याचे निवेदन
जोर्वे गावातील अवैध वाळू उपसा थांबवा जोर्वे ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी, तातडीने कारवाई करण्याचे निवेदन
Samgmner vijay kapse दि ५ नोव्हेंबर २०२६—विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने जोर्वे परिसरातील नदीच्या पात्रातून अहोरात्र बेसुमार व विनापरवाना अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे. यामुळे परिसरात दादागिरी व दहशत वाढली असून तातडीने ही बेसुमार अवैध वाळू उपसा थांबवून या अवैध धंद्यामागे असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी आग्रही मागणी जोरवे ग्रामस्थांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

जाहिरात
प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक यांना  ग्रामस्थांच्या वतीने शरद नाना थोरात, विठ्ठल काकड, अनिल बाळासाहेब दिघे ,संजय निवृत्ती थोरात, बादशहा बोरकर, पी.वाय दिघे, दिगंबर इंगळे, प्रमोद इंगळे ,भाऊसाहेब दिघे ,राजू थोरात ,धनंजय दिघे आदींसह विविध ग्रामस्थांनी निवेदन दिले.

निमंत्रण

या निवेदनात म्हटले आहे की जोर्वे परिसरातील प्रवरा नदीच्या पात्रातून अहोरात्र बेसुमार व विनापरवाना अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे आणि या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे परिसरातील गावांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरींच्या जवळच खड्डे पडल्याने विहिरींना धोका निर्माण झाला आहे याचबरोबर पाण्याची रासायनिक प्रदूषण विहिरीत दारूच्या बाटल्या आढळून येत आहेत.अशा प्रकारांमुळे दहशत व गुन्हेगारी वाढत चालली आहे.

स्थानिक प्रशासन हे हप्तेबाजी मध्ये अडकले असून याला प्रशासनाची मुख सहमती आहे. या प्रचंड वाळू उपसा मुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून जेसीबी व पोकलंडच्या साह्याने नदी खोदली जात आहे. या वाळू उपसा बरोबर अवैध दारू विक्रीचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या सर्व अवैध वाळू उपसावर तातडीने कारवाई करावी अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबनातील असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की बेसुमार होत असलेल्या वाळू उपसामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबर सामाजिक संतुलन बिघडले चालले आहे. दारू व अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळत असून तातडीने वाळूचा बंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे