आपला जिल्हा

संजीवनीच्या यश नन्नावरेची तैवानमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

 संजीवनीच्या यश नन्नावरेची तैवानमध्ये इंटर्नशिपसाठी निवड

दोन महिन्यांची संशोधन संधी; प्रवास, निवास व भोजनाचा संपूर्ण खर्च तैवानमधील विद्यापीठ उचलणार

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १४ नोव्हेंबर २०२६ : संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी यश संजय नन्नावरे याची तैवानमधील दायेह विद्यापीठात दोन महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या इंटर्नशिपसाठी यश तैवानला रवाना झाला असून, तेथे तो डॉ. सिन-लियांग ओऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेमिकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॉर मेडिकल डिव्हाईस’ या विषयावर संशोधन करणार आहे. विशेष म्हणजे ही इंटर्नशिप पूर्णतः प्रायोजित असून, यशच्या प्रवास, निवास आणि भोजनाचा संपूर्ण खर्च दायेह विद्यापीठाकडून केला जाणार आहे. तैवानमध्ये इंटर्नशिपसाठी जाणारा यश हा संजीवनीचा ७६ वा विद्यार्थी ठरला आहे.

जाहिरात

यशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे यांनी त्याचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांच्या हस्ते यश, त्याचे वडील श्री. संजय नन्नावरे आणि आई सौ. उज्वला नन्नावरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डीन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स डॉ. महेंद्र गवळी आणि विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.

जाहिरात

संजीवनीच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागामार्फत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये इंटर्नशिप आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. यापूर्वीही संजीवनीच्या विद्यार्थ्यांना रशिया, तैवान, कॅनडा, फिलिपाइन्स, ट्युनिशिया आणि युनायटेड किंगडम यांसारख्या देशांतील नामांकित विद्यापीठांमध्ये दोन ते सहा महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी मिळाली आहे.

 

 

 

 

 

 ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जागतिक संधींचे व्यासपीठ

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करावी, तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते. त्यांचे दूरदृष्टीपूर्ण शैक्षणिक विचार आणि कार्याचा वारसा आज श्री. नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीमध्ये समर्थपणे पुढे नेला जात आहे.

परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी मिळणे ही संजीवनीच्या गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षणपद्धतीची पावती आहे. अशा संधींमुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत कार्यपद्धती आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. विविध देशांतील विद्यार्थ्यांसोबत काम केल्याने त्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि जागतिक दृष्टिकोन अधिक व्यापक होतो. भविष्यातही जगातील नामांकित विद्यापीठांशी सहकार्य वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संजीवनी संस्था कटिबद्ध आहे.- अमित कोल्हे प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

यशच्या निवडीबद्दल त्याचे वडील संजय नन्नावरे यांनीही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “यशला आपल्या परिस्थितीची जाणीव आहे. संजीवनीतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेने दिलेल्या संधीमुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. त्याचे हे यश पाहताना पालक म्हणून मनापासून समाधान वाटते.” यावेळी यशनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “माझ्या या यशामध्ये आई-वडिलांचे कष्ट आणि संजीवनीतील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून मिळालेला अनुभव पुढील शिक्षणात आणि करिअरमध्ये उपयोगात आणण्याचा माझा प्रयत्न राहील.” एकूणच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि संशोधनाची दारे खुली करणाऱ्या संजीवनीच्या या उपक्रमामुळे यशच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे