आपला जिल्हा

धगधगते हिमशिखर हे पुस्तक संघर्षाचा प्रेरणादायी इतिहास – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

धगधगते हिमशिखर हे पुस्तक संघर्षाचा प्रेरणादायी इतिहास – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

पुस्तक प्रकाशनातून जागवल्या केबी दादा देशमुख यांच्या आठवणी

Sangmner vijay kapse दि १३ नोव्हेंबर २०२६–संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत नेतृत्वाची मोठी परंपरा लाभली आहे. के बी दादा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला सामाजिक समता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याकाळची परिस्थिती वर्णन आणि त्यांचे जीवन चरित्र हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या जीवनावरील धगधगते हिमशिखर हे पुस्तक संघर्षाचा इतिहास असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षण व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

ढोले लॉन्स येथे के.बी दादा देशमुख यांच्या जीवनावर आधारित डॉ. संतोष खेडलेकर लिखित धगधगते हिमशिखर या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉ संजय मालपाणी, मा आ डॉ सुधीर तांबे, दुर्गा तांबे, निर्मल कुमार देशमुख, अपर्णा देशमुख, अनिलराव देशमुख, रामहरी कातोरे, सुधाकर जोशी ,नानासाहेब शिंदे ,बाळासाहेब देशमाने,  अर्चना मुंडे, आरती आरोटे, हिरालाल पगडाल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, के बी दादा देशमुख यांचा जीवन प्रवास हा संघर्षाचा राहिला आहे. शिक्षणाप्रती त्यांचे मोठे प्रेम होते शिक्षणासाठी घरातून पळून जाऊन त्यांनी संगमनेरला येऊन शिक्षण घेतले. सामाजिक समता निर्माण करण्याचे धाडस त्यांनी केले. लहानपणी वकील होण्याची स्वप्न पाहिले आणि त्या ध्येयातून ते बहुजन समाजातील पहिले वकील झाले. आमदारकी नंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात त्यांनी मांडले.

जाहिरात

इतिहास लेखन अवघड काम आहे. विविध घटना व पुस्तकांचा अभ्यास, व्यक्तिमत्वाचा अभ्यास ,प्रवास वर्णन, शोध आणि प्रामाणिकपणा जपत काम करावे लागते .विविध व्यक्तींच्या जीवन प्रवास तपासून त्याची योग्य मांडणी करण्याचे काम डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले आहे. तर डॉ.संजय मालपाणी म्हणाले की, के बी दादा देशमुख यांना शिक्षणाविषयी मोठी आत्मीयता होती.जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शिक्षणातून जाती भेदाच्या भिंती नाहीशा करण्याचे काम त्यांनी केले. सुरुवातीच्या काळात न्यायालयाजवळ ते राहायचे खेडेगावातून कोणी आले तर जेवणासाठी त्यांच्याकडे यायचे. मानवतेचा मंत्र त्यांनी समाजाला दिला. मित्र आणि शत्रू त्यांना कायम सम वाटला असे सांगताना सध्या मैदानी खेळ कमी झाले आहेत .हे अत्यंत दुःखदायी असून यामुळे आजार वाढले आहे. त्यामुळे मुलांनी मैदानावर जास्त वेळ खेळले पाहिजे. याकरता पालकांनीही आग्रह करावा असे सांगताना के बी दादांच्या विविध आठवणी त्यांनी जागवल्या.

जाहिरात

तर मा आमदार डॉ तांबे म्हणाले की, के बी दादा हे समाज परिवर्तनातील मोठे व्यक्तिमत्व होते सामाजिक कामात त्यांनी कायम पुढाकार घेतला. त्यांच्या जीवन कार्याचा आदर्श घेऊन चांगली समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांना काम करावा लागणार आहे. यावेळी लेखक डॉ. संतोष खेडलेकर यांनी पुस्तकाविषयीचे मनोगत व्यक्त केले तर. दुर्गा तांबे, निर्मल कुमार देशमुख, अपर्णा देशमुख यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल देशमुख यांनी केले  सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर निर्मल कुमार देशमुख यांनी आभार मानले

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे