के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कबड्डी संघाला उपविजेतेपद

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कबड्डी संघाला उपविजेतेपद
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान

Kopargaon vijay kapse दि १३ नोव्हेंबर २०२६– क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर, तालुका क्रीडा समिती कोपरगाव व संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी १४, १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या शालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपविजेतेपद पटकावले.

महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सांघिक कौशल्य, जिद्द, चिकाटी व उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली. के. बी. रोहमारे महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय कार्य करत असून, या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. परिसरातून या यशाचे कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त, सचिव व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे आणि उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले. भविष्यातही विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, अशा शुभेच्छा दिल्या.



