आपला जिल्हा

थोरात कारखान्याची ऊस उत्पादकांना मोठी भेट; पहिली उचल ३२०० रुपये प्रतिटन जाहीर

थोरात कारखान्याची ऊस उत्पादकांना मोठी भेट; पहिली उचल ३२०० रुपये प्रतिटन जाहीर

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा; बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताला प्राधान्य

Sangmner vijay kapse दि १२ नोव्हेंबर २०२६ : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले यांनी दिली.

जाहिरात

याबाबत माहिती देताना उपाध्यक्ष घुले म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याने कायम सभासद, शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. शिस्त, काटकसर, दूरदृष्टी आणि पारदर्शक कारभाराच्या बळावर कारखान्याने सहकार क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचाही कारखान्यावर मोठा विश्वास आहे.

जाहिरात

यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही कारखान्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रतिटन २०० रुपये अनुदान दिले. तसेच कामगारांना २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. याशिवाय दिवाळीमध्ये सुमारे २२ कोटी ११ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले. या आर्थिक व्यवहारामुळे संगमनेरच्या बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल झाली.

जाहिरात

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिले असून शेतकरी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

कारखान्याने जाहीर केलेल्या या पहिल्या उचलीमुळे शेतकरी आणि ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे