आपला जिल्हा

कोपरगाव तालुक्यातील रस्ते विकासाला १५ कोटींचा निधी मंजूर : आ. विवेक कोल्हे

कोपरगाव तालुक्यातील रस्ते विकासाला १५ कोटींचा निधी मंजूर : आ. विवेक कोल्हे

कोपरगाव – धारणगाव व कुंभारी- कोळपेवाडी- शहाजापूर रस्त्याच्या सुधारणेला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आ.विवेक कोल्हे यांनी मानले आभार

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १३ नोव्हेंबर २०२६: कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या दळणवळण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.कोपरगाव -धारंगाव MDR-8, कुंभारी-कोळपेवाडी -शहाजापूर MDR-85 या रस्त्यांच्या सुधारणेसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सुमारे ५ किलोमीटर रस्त्याचे सुधारणा काम होणार असून, यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल निधीसाठी आमदार कोल्हे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केलेला होता.

जाहिरात

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था दूर व्हावी, शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणारी दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. या मागणीची दखल घेत रस्ते विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने या परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.केंद्रीय रस्ते निधी (CRF) माध्यमातून हा रस्ते विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

जाहिरात

ग्रामीण भागाच्या विकासात रस्ते हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. चांगल्या रस्त्यांमुळे केवळ प्रवास सुलभ होत नाही, तर शेतमालाची बाजारपेठेपर्यंत वाहतूक, विद्यार्थ्यांचा शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास, रुग्णांना वेळेत उपचार मिळणे तसेच ग्रामीण भागातील व्यापार आणि रोजगाराच्या संधी वाढण्यासही मदत होते. त्यामुळे या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील गावांच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे अशी प्रतिक्रिया आ. कोल्हे यांनी दिली आहे.

या महत्त्वपूर्ण रस्ते विकासकामांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. शासनाच्या सकारात्मक सहकार्यामुळे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे